esakal | स्मार्ट टिप्स 
sakal

बोलून बातमी शोधा

Fruit
 • टोमॅटो विविध क्षारांनी युक्‍त असल्याने शरीरास उपयुक्‍त असतो.
 • मधूमेह, वजन कपात आणि मूत्राशयाच्या विकारात टोमॅटो गुणकारी आहे.
 • टोमॅटो रसामुळे आतडी, जठर स्वच्छ राहते.
 • कारल्याच्या भाजीमध्ये बडीशेप व गूळ मिसळल्यास त्याचा कडवटपणा कमी होतो व ती रुचकर लागते.
 • पेपर डोसा करताना अर्धी वाटी पाण्यात थोडी तुरटी फिरवून ते पाणी पिठात घातल्यास डोसा पांढरा व कुरकुरीत होतो. 

स्मार्ट टिप्स 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा
 • टोमॅटो विविध क्षारांनी युक्‍त असल्याने शरीरास उपयुक्‍त असतो.
 • मधूमेह, वजन कपात आणि मूत्राशयाच्या विकारात टोमॅटो गुणकारी आहे.
 • टोमॅटो रसामुळे आतडी, जठर स्वच्छ राहते.
 • कारल्याच्या भाजीमध्ये बडीशेप व गूळ मिसळल्यास त्याचा कडवटपणा कमी होतो व ती रुचकर लागते.
 • पेपर डोसा करताना अर्धी वाटी पाण्यात थोडी तुरटी फिरवून ते पाणी पिठात घातल्यास डोसा पांढरा व कुरकुरीत होतो. 
 • एका वेळी खूप कॉफी पूड आणून ठेवू नये.
 • कॉफी नेहमी हवाबंद डब्यात ठेवावी.
 • कॉफी करताना ती खूप वेळ उकळत ठेवू नये.
 • वेलचीची पूड करून फ्रिजमध्ये ठेवल्यास वास टिकतो.
 • सुके खोबरे किसून, किंचित भाजून ठेवावे. जास्त दिवस टिकते.
 • नारळामधून शरीराला भरपूर फायबर व प्रोटिन मिळतात.
 • निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक अन्नाचा आहारात समावेश करावा. 
 • आहारात कडधान्ये, पालेभाज्या, दूध, फळे यांचा समावेश असावा.
 • पपईचा गर चेहऱ्याला लावला असता त्वचेला चकाकी येते.
 • पपईमधून शरीराला भरपूर प्रमाणात पोटॅशिअम मिळते. 
 • पपईमध्ये कमी कॅलरीज, पण भरपूर पोषण मूल्य असतात, त्यामुळे डाएटवर असलेल्यांनीही पपई खायला हरकत नाही.

Edited By - Prashant Patil