esakal |  'सो यम्मी' प्रवास !
sakal

बोलून बातमी शोधा

 'सो यम्मी' प्रवास !

एखादा प्रवास आवडल्यास त्याला तुम्ही ‘यम्मी’ म्हणाल का? नाही. परंतु अशी एक व्यक्ती आहे की, जी तिच्या प्रवासाला ‘यम्मी’ म्हणते आणि ‘सो यम्मी’ याच नावानं ब्लॉगदेखील लिहिते.

 'सो यम्मी' प्रवास !

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

नाव : संयमी टकले
वय : २५ वर्षे
गाव : पुणे
काम : सोशल मीडिया मॅनेजर

तुम्ही एखादा पदार्थ चाखलात आणि तुम्हाला तो आवडल्यास तुम्ही आपसूकच म्हणता ‘सो यम्मी’. हो ना? पण एखादा प्रवास आवडल्यास त्याला तुम्ही ‘यम्मी’ म्हणाल का? नाही. परंतु अशी एक व्यक्ती आहे की, जी तिच्या प्रवासाला ‘यम्मी’ म्हणते आणि ‘सो यम्मी’ याच नावानं ब्लॉगदेखील लिहिते. शिवाय तिच्या नावात असलेल्या ‘यमी’ या शब्दामुळं तिचं ‘सो यम्मी’ हे नाव नक्कीच समर्पक व आकर्षक वाटतं. संयमी टकले; तिला याविषयी विचारलं तेव्हा लक्षात आलं तिचं खाण्यावरच विलक्षण प्रेम आणि तिच्या नावातलं  ‘यमी’. म्हणून ‘सो यम्मी’.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या प्रेमापोटी तिनं एकटीनं केलेली अनोखी ‘खाद्ययात्रा’ही तिच्या आवडी इतकीच विलक्षण आहे. ईशान्य भारत, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर, नेपाळ, तिबेट अशा विविध प्रांतातील वैविध्यपूर्ण आणि पारंपरिक पदार्थांचा तिनं आस्वाद घेतला आहे.

संयमी एक उत्तम सोलो ट्रेकर व सोलो ट्रॅव्हलर आहे. ती सांगते, ‘‘मी वयाच्या २१व्या वर्षी पहिली सोलो ट्रीप केली, ती योगायोगानंच. काही उपचारांसाठी कोचीनला जाण्याचा योग आला. या ट्रीपनं खूप शिकवलं. मला सुरुवातीपासूनच गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण करण्याची सवय आहे. त्यामुळं अनोळखी ठिकाणी कसं वावरायचं, स्थानिक लोकांशी संवाद कसा साधायचा हे जाणून घेता आलं. ही शिकवण माझ्या पुढच्या प्रवासात कामी आली. संयमीनं ‘बारा शिग्री ग्लेशिअर’ सोबतच अनेक हिमालयीन ट्रेक्स केले आहेत. हिमाचल प्रदेशातील ६ हजार मीटर उंचीच्या शिखर तिनं चढाई केली आहे. ती सांगते, ‘माझ्यात ट्रेकिंगची आवड माझ्या वडिलांमुळं निर्माण झाली. या आवडीमुळंच मी पुढं ‘जवाहरलाल इन्स्टिट्यूट’, ‘नेहरू इन्स्टिट्यूट’, ‘हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट’ व ‘निमास’सारख्या संस्थांमधून कोर्स पूर्ण केले.’’ संयमी सध्या तिचं कामकाज सांभाळत पुण्यातील नामांकित ‘गिरीप्रेमी’ या संस्थेसोबत ‘ट्रेक लीडर’ म्हणून काम करते. शिवाय बेसिक रॉक क्लायबिंगचं प्रशिक्षणही देते. आजवर तिनं मेघालय, आसाम, नागालँड, हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, उत्तराखंड, केरळ, नेपाळ, भूतान, ओमान या ठिकाणी एकटीनं प्रवास केला आहे.

प्रशिक्षक, ट्रेकर, ट्रॅव्हलर, ब्लॉगर अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणखीन जाणून घ्यावसं वाटतं ना? संयमी तिच्या ब्लॉगद्वारे ट्रेकर्स, ट्रॅव्हलरस् ना मार्गदर्शन करते. एकदा तिच्या या ‘sooyummy’ प्रवासाची सफर आपणही करायला काहीच हरकत नाही. नाही का?

loading image