esakal | जागर स्त्री आरोग्याचा; खुलेपणाने बोला मसिक पाळीवर
sakal

बोलून बातमी शोधा

जागर स्त्री आरोग्याचा; खुलेपणाने बोला मसिक पाळीवर

जागर स्त्री आरोग्याचा; खुलेपणाने बोला मसिक पाळीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मासिक पाळी नियमितता चांगल्या आरोग्याची चाचणीच असते. आपल्याकडे आजही मासिक पाळीबाबत गैरसमज आहेत. ते रुढी-अंधश्रद्धातून आले आहेत. यासाठी लोकशिक्षणच प्रभावी ठरू शकते. या दुर्लक्षित विषयांवर चर्चा करीत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मोनिका कुल्लोळी.

खुलेपणाने बोला मसिक पाळीवर !

मासिक पाळीचे व्यवस्थापन आणि त्यासोबतच्या रुढी, अंधश्रद्धांना दूर करण्याची मोहीम समांतर पातळीवर हाताळावी लागेल. स्त्रिया व मुलींनी स्वच्छ कापड, सामग्री वापरणे; मुबलक साबण-पाण्याचा वापर करणे; वापरलेल्या सामग्रीची योग्य विल्हेवाट लावणे या गोष्टी मासिक पाळी व्यवस्थापनात येतात. युनिसेफ व डब्ल्यूएचओ त्यावर बोलते, परंतु मासिक पाळीभोवती असलेले गैरसमज, रूढी, अंधश्रद्धांशी लढा स्वतःपासून सुरू करावा लागेल. आजही हा विषय निषेधाचा, मौनाचा मानला जातो. त्यातून नकारात्मक मानसिकता तयार होते. स्त्री-पुरुषांमधील असमानतेला खतपाणी मिळते.

हेही वाचा: गोरेगावमध्ये NCB ची छापेमारी, ड्रग्ससह दोन जण ताब्यात

अगदी तीस- चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत मासिक पाळीबाबत परिस्थिती आव्हानात्मक होती. आरोग्य सेवा सहज उपलब्ध नव्हती. महिलांकडून चिंधी, राख, भुसा, शेण्या आदी वापर होई. खूप अंधश्रद्धा प्रचलित होत्या. महिलांना अंधार पडल्यानंतरच साहित्य लपवण्याची कसरत करावी लागे. २००५ नंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाने देशभरात मासिक पाळीविषयीचे व्यापक प्रबोधन केले. नाडी, कपड्यापासून टाईमपीस, फ्लानेल अशी दोन तासांत वाळणारी सामग्री उपलब्ध झाली. अंतर्वस्त्र, डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड उपलब्ध झाले. सी-कप आले. पुरुषांचाही याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता मोठा वर्ग समजूतदारपणे स्त्रियांना आधार देतोय.

मासिक पाळीत अनियमितपणा, पाळीदरम्यानच्या अतिरक्तस्रावाकडे दुर्लक्ष करू नये. हा त्रास अंगावर काढू नका. त्यामुळे कामाची क्षमता कमी होणे, अनुउत्साह, सतत थकवा-झोप, गळून गेल्यासारखे वाटणे, शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे यासारख्या तक्रारी दिसतात. ४५ नंतर स्त्रियांमध्ये अकार्यक्षम गर्भाशयाचा त्रास अधिक असतो, त्यांनीही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. यातील अनेक तक्रारींबाबत वैद्यकीय चाचण्या उपलब्ध आहेत. ज्याद्वारे उपचार शक्य आहेत.

हेही वाचा: पुण्यातील RSSच्या कार्यालयाबाहेर संशयित बॅग; परिसरात तणावाचं वातावरण

आता सॅनिटरी कचऱ्याचीही समस्या निर्माण होतेय. एक महिला तिच्या आयुष्यात अंदाजे सव्वाशे किलो हा कचरा निर्माण करते. त्याच्या विघटनासाठी ५०० ते ८०० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे हा कचरा रोखणे, हेही ध्येय हवे. ‘डिस्पोजेबल पॅड’च्या ऐवजी पुन्हा वापर करता येणारे कापड व ‘मेन्स्टूल कप’ यांचा वापर उपयुक्त ठरतो. स्त्रियांचे आरोग्य आणि आपले पर्यावरण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

काळजी घ्या

० सॅनिटरी नॅपकिन सहा ते आठ तासांनी किंवा दिवसातून किमान एकदा बदला.

० जास्त रक्तस्राव असल्यास ३ तासांनी बदला; पूर्ण भिजेपर्यंत वापर टाळा.

० कापड वापरणार असाल तर ते स्वच्छ, नरम, शोषक व कोरडे घ्या.

० कापड पुनर्वापराआधी स्वच्छ-कोरडे ठेवा. एकमेकांचे कापड वापरू नका.

० या काळात सोबत पॅड बाळगा. जनेंद्रियाचींची नेहमीच स्वच्छता ठेवा, पाळीत दोनदा अंघोळ करा.

loading image
go to top