Women`s Day:महिला मल्टिटास्किंग समज आहे की गैरसमज!

Womens day akshata pawar writes about women are multitasking
Womens day akshata pawar writes about women are multitasking

ऑफिस मध्ये उद्या मीटिंग आहे, आणि रियाचा शाळेत पालकांची मीटिंग सुद्धा ! आता मी ऑफिसची मीटिंग करू की रियाचा शाळेतली? असा प्रश्न प्रत्येक वर्किंग वूमनला पडतो... पण त्यातून पण मार्ग शोधून काढणे आणि एकच वेळी सर्व काही सांभाळणे हीच खरी महिलांची शक्ती. मल्टिटास्किंग हा शब्द जेव्हा केव्हा आपण ऐकतो, तेव्हा एकाच वेळी तीन-चार काम हाताळत असलेल्या महिलेचं चित्र अगदी डोळ्या समोर येतो. पण, नुकतेच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, महिला या मल्टिटास्किंग नाहीत. पुरुष असो किंवा महिला कोणीच मल्टिटास्किंग नसतात. 

मल्टिटास्किंग म्हणजे काय?

  • अल्पावधीत अनेक स्वतंत्र कार्ये करण्याची कृती म्हणजेच मल्टिटास्किंग होय. एकाच वेळी या सर्व कार्यांना करण्यासाठी वेगवान आणि वारंवार एका कामाकडून दुसऱ्या कामाकडे  लक्ष वळविणे आवश्यक आहे.
  • या अभ्यासातील हे स्पष्ट झाले आहे की मानवी मेंदू एकाच वेळी एकाधिक क्रियाकलाप व्यवस्थापित करू शकत नाही. विशेषतः जेव्हा दोन कार्ये एकसारखी असतात तेव्हा मेंदूला याचा अंदाज लागत नसल्याने मल्टीटास्किंग खूप कठीण होते.
  • परंतु, क्रियाकलापांमध्ये द्रुतपणे स्विच करण्यात मानवी मेंदू चांगले असतात, ज्यामुळे लोकांना असे वाटते की, ते मल्टिटास्किंग करीत आहेत. मेंदू, एकावेळी फक्त एकाच कार्यात लक्ष वेधण्यास सक्षम असतो.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या नवीन संशोधना बद्दल
या नवीन अभ्यासानुसार, जर्मनीतील संशोधकांनी संख्या आणि अक्षरे चांगल्या प्रकारे ओळखण्याची क्षमता नेमकी पुरुषांना का महिलांना चांगल्या प्रकारे जमते याचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी 48 पुरुष आणि 48 महिलांवर विविध प्रयोग करण्यात आले. त्यातील काही प्रयोगांमध्ये, सहभागींनी एकाच वेळी दोन कार्यांकडे लक्ष देणे आवश्यक होते (ज्याला समवर्ती मल्टीटास्किंग म्हणतात), तर इतर प्रयोगांमध्ये त्यांना दोन कामांदरम्यान लक्ष बदलण्याची आवश्यकता होती (ज्याला अनुक्रमिक मल्टीटास्किंग म्हणतात). मल्टिटास्किंगच्या तुलनेत नियंत्रित स्थितीमध्ये (केवळ एक काम करताना) मेंदू कशा प्रकारे काम करतो याचा अभ्यास करण्यात आला. यातून असे आढळले की, मल्टिटास्किंगमुळे पुरुष आणि महिला या दोन्ही गटांना काम पूर्ण करताना समान वेळ लागला. त्यामुळे महिला आणि पुरुष हे दोघे ही मल्टिटास्किंगमध्ये असक्षम आहेत. 

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मानसिक आरोग्यावर परिणाम
महिलांनी घरकाम आणि मुलांच्या संगोपन हेच कार्य करावे, अशी काहीशी मासिकात पूर्वीचा काळात पाहायला मिळत होती. आज पुरुष वर्ग घरकाम आणि मुलांच्या संगोपनाचा मोठा वाटा गृहित धरत आहेत, तरी काम आणि कौटुंबिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या डोमेनमध्ये लैंगिक भेद कायम आहेत.  तर, मल्टीटास्किंग म्हणजे आईने हे सर्व काम करावे अशी अपेक्षा असते. परंतु, या जबाबदाऱ्यांमुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर तसेच, कामाच्या क्षमतेवर देखील प्रभाव पडतो हे यातून सिद्ध झाले आहे.

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा

International Womens Day

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com