इलेक्ट्रिक कार आणि चार्जिंग

electric-car
electric-car

भारतात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर येत असून, केंद्र सरकारच्या धोरणानुसार भविष्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने पाहायला मिळतील. भारतासह ब्रिटनसारख्या प्रगत देशांत २०३०पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे. ही वाहने नक्की कशी असतील व त्यांना रस्त्यावर आणताना काय समस्या निर्माण होतील, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. इलेक्ट्रिक कार आणि तिच्या चार्जिंगसंदर्भातील काही प्रश्‍नांची उत्तरे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इलेक्ट्रिक कार घरात कशी चार्ज करायची?
तुम्ही तुमच्या मेन्स सप्लायमध्ये कारच्या बॅटरीचा प्लग घालताच चार्जिंग सुरू होईल असे तुमचे उत्तर असेल, मात्र ते एवढे सापे नाही. तुम्ही तुमच्या पार्किंगमधील कारच्या बॅटरीचा प्लग घरातील इलेक्ट्रिक सप्लायला जोडताच चार्जिंग सुरू होईल, मात्र तुमची रिकामी बॅटरी पूर्णपणे चार्ज व्हायला खूप मोठा कालावधी लागू शकतो. तुमची बॅटरी जेवढी मोठी, तेवढा कालवधीही जास्त असेल. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ८ ते १४ तास लागतील आणि बॅटरीची क्षमता मोठी असल्यास चोवीस तासही लागू शकतात. याला पर्याय म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातच फास्ट चार्जिंग पॉइंट बसवता येईल, मात्र त्याची किंमत खूप जास्त असते. त्यासाठी ७० हजार रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. (ब्रिटनमध्ये असे पॉइंट उभारण्यासाठी सरकार ७५ टक्के रक्कम देणार आहे.) हा फास्ट चार्जरही बॅटरीच्या क्षमतेनुसार पूर्ण चार्जिंगसाठी सुमारे १२ तास घेईल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बॅटरी चार्जिंगसाठीचा खर्च किती?
इलेक्ट्रिक कारचा मुख्य फायदा चार्जिंगचा पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत अत्यंत कमी खर्च हाच आहे. अर्थात, कार कोणती आहे यावर हा खर्च अवलंबून असेल. तुमच्या भागातील इलेक्ट्रिसिटीचे दर किती आहेत, त्यानुसार चार्जिंगचा खर्च ठरेल. परदेशात रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिसिटीच्या वापराचे दर कमी असतात, त्यामुळे उत्पादक रात्रीच्या वेळी चार्जिंग करण्याचा सल्ला देतात. ब्रिटनमधील एका ग्राहक संघटनेच्या अंदाजानुसार, एका इलेक्ट्रिक कारचा वर्षाचा चार्जिंगचा खर्च ३५ ते ४० हजार रुपये असेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सार्वजनिक चार्जिंग पॉइंट कसे असतील?
स्थानिक प्रशासनाला रस्त्यावर चार्जिंग पॉइंट उभारावे लागतील. ब्रिटनमध्ये रस्त्यावरील काही दिव्यांवर निळ्या रंगाचे संदेश दिसतात, येथे तुम्हाला चार्जिंगसाठीचा प्लग मिळतो. काही इलेक्ट्रिक कार कंपन्यांनी त्यांच्या कारमध्ये चार्जिंग पॉइंट शोधणार अॅप बसवले आहे, त्याचबरोबर काही बेवसाइट्स व अॅप्स तुम्हाला जवळच्या चार्जिंग पॉइंटपर्यंत पोचवतील. (ब्रिटनमध्ये सध्या अशी ३० हजार चार्जिंग स्टेशन्स आहेत.) भारतासारख्या देशात असे स्टेशन वाढण्यासाठी सरकार योजना आखत आहे. चार्जिंगसाठी महिन्याचे फिक्स्ड दर किंवा प्रत्येक चार्जिंगसाठीचा दर असे पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ‘टेस्ला’ या वाहन उत्पादक कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी सूपरचार्जर उपलब्ध करून दिले असून, त्यांच्या दाव्यानुसार बॅटरी अर्ध्यातासात ८० टक्के चार्ज होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com