esakal | कोरोना काळातील शैक्षणिक असमतोल विद्यार्थ्यांच्या जिव्हारी
sakal

बोलून बातमी शोधा

School

कोरोना काळातील शैक्षणिक असमतोल विद्यार्थ्यांच्या जिव्हारी

sakal_logo
By
संकेत शिरसाठ

"शिक्षण हे एकमेव उन्नतीचे साधन आहे असे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "पण कोरोना ह्या जागतिक संकटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज आपला भारत देश प्रगतीच्या अती उच्च शिखराकडे वाटचाल करत असताना कोरोना विषाणू म्हणजे Covid-19 सारखे संकट जगभर महाथैमान घातले आहे. या विषाणूने सर्वच क्षेत्रात मोठ्या अडचणी निर्माण केलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटासमोर जागतिक बलशाली महासत्ता असलेले राष्ट्र देखील हतबल झालेली आपल्याला दिसत आहेत. यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च २०२० पासून काही कालावधी साठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली. दरम्यानच्या काळात कोरोणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय किंवा अडथळा येऊ नये विद्यार्थी हा शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहू नये, म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडण्यात आला. ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी सर्व साधने शहरातील किंवा श्रीमंत शिक्षीत पालकांच्या मुलांकडे होती किंवा आहेत. परंतु ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कष्टकरी अशिक्षित पालकांच्या मुलांचे काय.गेल्या एक ते दिड वर्षांपासून शाळा व महाविद्यालय बंद आहेत परंतु शाळेतील विद्यार्थी असो की महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणारा युवक विद्यार्थी असो त्यापर्यंत ऑनलाईन शिक्षणाची सोय साधणं आजही नाहीत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आपल्याला दिसत आहे...

कोरोना पूर्व काळातील शैक्षणिक वर्षे आणि आत्ताचे ऑनलाईन शिक्षण यात खूप फरक आहे. कोरोना पूर्व काळातील प्रत्यक्ष शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होत होता . विविध परिक्षांमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता समजून येत होती. महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकास होतो त्यांच्या आत्मविश्वास वाढीस लागतो शिक्षणाची व वाचणाची ओढ निर्माण होते.

हेही वाचा: झूम : वाहन विमा : लाखमोलाचे सुरक्षा कवच

प्रॅक्टिकलच्या वेळेस तासंतास प्रयोग शाळेत उभे राहून नवीन नवीन प्रयोग करत विद्यार्थी हा विज्ञानाची कास धरत असतो विज्ञानाविषयाची निष्ठा व विज्ञानवादी विचार त्याच्या मनावर रुजत असतात. विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार होत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थी हा शिक्षकांचे अनुकरण करत व शिक्षकांच्या सहवासात मोठा होत असतो आणि उद्याचे भवितव्य तो आपले घडवत असतो. शिक्षकांचे प्रत्यक्ष वर्गात फळ्यावर शिकवत असतांना समजले नाही तर सरळ शिक्षकांना प्रश्न विचारण शिक्षकांशी होणाऱ्या गप्पा रोज सकाळी कॉलेजला गेल्यावर शिक्षकांना नमस्कार , शुभ सकाळ बोलणे मित्र मैत्रिणी याच्या सोबत आगाऊ पणा मजाकमस्ती करणे हे सर्व लॉकडाऊनच्या काळात बंद आहे...

कोरोना संकटात लॉकडाऊन मुळे इ. १०वी व १२वी सारख्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या वर्गातील परीक्षा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थींचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणे म्हणजे परीक्षा पुढे ढकलने किंवा परीक्षा रद्द करणे नव्हे तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही याची काळजी घेणे होय. कष्टकरी गरिब जनतेची मुले डोळ्यासमोर ठेवून शाळा बंदच्या काळात या समाजघटकातील मुलांचे शिक्षण कसे अखंडपणे चालू राहील याची योजना करायला हवी. कोरोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरचे मोठे संकट आहे. माणवी जीवणावर सर्वच बाजूने या संकटाने प्रभाव टाकला आहे. या रोगाला अजून प्रतिजैविके न सापडल्यामुळे रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय योजणे एवढाच आता सर्वासमोर पर्याय आहे...

हेही वाचा: आत्मविश्वास, सेवा आणि गुणवत्तेवर व्यवसाय मोठा होतो- प्रविण माने

या परिस्थितीतून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जगभर भितीचे वातावरण आहे. जागतिक व देशाच्या अर्थव्यवस्था लॉकडाऊनमुळे बेरोजगारीच्या विळख्यात अडकल्यामुळे डळमळीत झालेली आहे. ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी शहराकडून गावाकडे निघाले आहेत कोरोना संकटामुळे अनेक देशातील शिक्षण संस्था देखील बंद आहेत "युनेस्को" च्या अहवालानुसार एप्रिल२०२० मध्ये १८८ देशात १५४ कोटी विद्यार्थी घरी बसले आहेत. भारतात १५ लाख शाळा बंद आहेत. त्यामुळे २६ कोटी विद्यार्थी व ८९ लाख शिक्षक घरी बसले आहेत तर उच्च शिक्षणात ५० हजार शिक्षणसंस्था बंद आहेत व ३.७० कोटी विद्यार्थी आणि १५ लाख महाविद्यालयीन शिक्षक घरी बसले आहेत. म्हणजे एकूण ३० कोटी विद्यार्थी घरी बसले आहेत. कोरोनाची समस्या ही केवळ आरोग्याची समस्या आहे असे मानले जाते. पण या संकटाला शैक्षणिक समस्यांची बाजू आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. लोकांचे एकटेपण घालवण्यासाठी रामायण, महाभारत या सारख्या मालिका दुरदर्शनवर दाखवून भूतकाळातल्या आभासी जगात जनतेला रमवून वर्तमानातील समस्यांवर मात करता येणार नाही...

युनेस्को ने शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्येवर तातडीने मार्ग काढणाच्या सुचना आपल्या सभासद देशांना दिल्या आहेत. शिक्षणात आलेल्या या व्यत्ययाने मुलांना शिक्षण हक्कापासून वंचित राहावे लागत आहे असे मत "युनेस्को" ने नोंदविले आहे. कोरोना काळात शिक्षण बंद न करता त्यासाठी नवे मार्ग शोधण्यासाठी गरज निर्माण झाली आहे म्हणून गरिब विद्यार्थ्यांचे शिक्षण न थांबता पर्यायी मार्ग शोधणे हेच आजच्या काळातील आव्हान व गरज आहे...

दुरशिक्षण माहिती तंत्रज्ञानाचा वापर, यू-ट्यूब, हँगआउट, मल्टिमीडीया ,मोबाईल फोन ई-लायब्ररी, दुरदर्शन इ. माध्यमातून अनेक देशांनी तातडीने मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून वरील प्रकाराच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेतली तर आपल्या देशाने सुद्धा दिर्घ काळासाठी शैक्षणिक धोरण ठरविणे आवश्यक आहे. आपल्या देशात उच्च शिक्षणात व मेडिसिन, इंजिनेअरिंग ,काँमर्स व मँनेजमेंट यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो विद्यार्थी. आर्थिक दुष्ट्या वरच्या स्तरातील असल्यामुळे लँपटाँप,इंटरनेट इ. खर्च त्यांना परवडतो. त्यामुळे प्रामुख्याने अभिजन वर्गाच्या छोट्या गटांचा अभ्यास आँनलाईन चालू आहे. हाच अनुभव शालेय शिक्षणातही आहे ज्या उच्च मध्यमवर्गीय यांची मुले सर्व सोयीने युक्त अशा पंचतारांकित शाळेत जात आहेत, त्यांचेही आँनलाईन शिक्षण चालू आहे. समस्या आहे ती मात्र बहुसंख्य कष्टकरी, गरिब वर्गातील मुलांची भटके विमुक्त अदिवासी ग्रामीण भागांतील सरकारी किंवा अनुदानित शाळेत जाणाऱ्या मुला मुलींची.!

माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा प्रसार शिक्षणाचा विस्तार, शिक्षणाचा दर्जा, शिक्षणाची संधी वाढविण्यास भरपूर वाव आहे. असे वाटते परंतु "ट्राय" च्या अहवालानुसार भारतात२०२० मध्ये इंटरनेट वापरणार्यांची संख्या६८.४६ कोटी आहे मोबाईल फोन वापरणार्यांची संख्या४८.८२कोटी आहे तर इंटरनेट सह स्मार्ट फोन वापरणार्यांची संख्या४०.७२ कोटी आहे तर T.V पाहणार्यांची संख्या ७६ कोटी इतकी आहे हा माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार झालेला दिसत असला तरी त्यात प्रचंड प्रमाणात विषमता आहे भारतात ५२% जनता इंटरनेटचा वापर करते म्हणजे निम्मा भारत आजही इंटरनेटच्या लाभापासून वंचित आहे ग्रामीण भागात ३६% जनता व शहरात ६४ % जनता इंटरनेटचा वापर करते तर ६७% पुरुष व ३८% स्त्रिया भारतात इंटरनेटचा वापर करतात. माहिती तंत्रज्ञान हे शहरी, सधनवर्ग व पुरुष यांचीच सध्यातरी मक्तेदारी होत आहे. त्यामुळे "नॅशनल डिजिटल लायब्ररी", "स्वयम ", "शोध गंगा", इ. सरकारी प्रकल्पांचा फायदा मर्यादित होत आहे या प्रकारच्या ऑनलाईन शिक्षणात कम्प्युटरची किंमत, इंटरनेटचा खर्च, विजेचा पुरवठा. इ. प्रमुख अडचणी आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही चैन शहरातील सधनवर्गाला परवडते.!

हेही वाचा: YIN च्या श्रीगोंद्यातील विद्यार्थी-संशोधकांचा राष्ट्रीय स्तरावर डंका

अनेक देशांनी टी.व्ही माध्यमाचा वापर जास्त करायला सुरवात केली आहे. भारतात नऊशेहून अधिक चॅनेल्स आहेत व घरी बसलेल्या विद्याथ्यांसाठी या चॅनेलचा वापर कसा करून घेता येईल याबद्दल शिक्षण खात्याकडून पावले उचलली जाणे आवश्यक आहे. १५ जून पासून राज्य शासन व शिक्षण विभागानाचे अधिकारी यांनी ऑनलाईन शिक्षण शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवसापासून अध्यापन सुरू आदेश दिले आहेत परंतु स्थानिक पातळीवरील येणाऱ्या अडचणींचे काय.

शाळेच्या प्रांगणात खेळणारी बहरणारी शिकणारी सहशिक्षणातून आनंददायी वातावरणात नवनव्या संकल्पना शिकत स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणारी मुल ऑनलाईन शिक्षण खरच शिकत आहेत का... किंवा शिकली आहेत का...? हा खुप मोठा प्रश्न शिक्षण व्यवस्थेपुढे ,समाजापुढे, पालकांपुढे आणि शिक्षकांपुढे उभा आहे..

शासनाने प्रत्येक शाळा व महाविद्यालयाचे ऑनलाईन वर्गात किती विद्यार्थी हजर राहतात याची माहिती मागवावी म्हणजे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला नेमकी कळेल व त्यानंतर जो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थी पर्यंत आपल्याला शिक्षण कसे पोहचवता येईल जेणेकरून तो शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. कोरोनाच्या घालून दिलेल्या नियमाच्या अधिन राहून शिक्षक स्वतः विद्यार्थी पर्यंत पोहचून शिक्षण देऊ शकतात. या सर्वांचा विचार करून सरकारने आता या बद्दल निर्णय घेणे आवश्यक आहे. " कारण शिक्षण आहे मला तुम्हाला आणि सर्वांना संविधानाने दिलेला अधिकार"

(संकेत शिरसाठ

डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव.)

loading image