सोशल डिस्टंसिंग आणि 'नवरात्रोत्सव'

सुवर्णा येनपुरे-कामठे
Wednesday, 21 October 2020

अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करूनही दांडिया, गरबा खेळतानाचे चित्र दिसत आहे. डिझायनर पीपीई किट घालून दांडिया खेळत असलेला व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. 

नवरात्रोत्सव म्हणजे सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. नवरात्रोत्सव म्हणजे उपवास, नवरंग आणि त्याहून आकर्षणाची बाब म्हणजे दांडिया! कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येक जण सोशल डिस्टंसिंग ठेवूनच सण साजरा करत आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करूनही दांडिया, गरबा खेळतानाचे चित्र दिसत आहे. डिझायनर पीपीई किट घालून दांडिया खेळत असलेला व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संगीताच्या तालावर पारंपरिक लुकमध्ये दांडिया खेळण्याचे थ्रिल वेगळेच असते. त्यात सहभागी होण्यासाठी दांडिया खेळण्याची प्रॅक्टीस करण्यापासून ड्रेस निवडण्यापर्यंतच्या विविध गोष्टींचा समावेश असतो. तुम्हीही दांडियासाठीचे खास पेहराव, दागिने घेऊन सज्ज झाला असालच. यासाठी मुलींकडून विशेष महत्त्व दिले जाते ते चनियाचोळीला! चनियाचोळीचे वेगवेगळे प्रकार, जीन्स-कुर्ती, त्यावर घालायच्या मोती-कवड्यांच्या माळांचे प्रकार बाजारात आले आहेत. मुलांसाठीही कुर्ती, शॉर्ट कुर्ते आणि पायघोळ सदरेही आले आहेत. या वर्षीही बांधणीचे लेहंगे, चनियाचोळी तर आहेतच; त्याशिवाय जीन्सवर घालता येण्यासारख्या बांधणी कुर्तीजची सध्या बाजारात चलती आहे. नवरात्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या पेहरावात जरदोसी काम केलेल्या कपड्यांपेक्षा बांधणीवर कवड्या, पांढरे मोती यांनी वर्क केलेल्या चोळी, कुर्तीजना जास्त मागणी आहे. काही ठिकाणी जीन्स पँट घालून त्यावर ब्राइट कुर्ती, राधाकृष्ण पेंट केलेल्या कुर्ती, तसेच प्लेन शॉर्ट कुर्तीवर मोठे ऑक्साइडचे, कवड्यांचे दागिने असा पेहराव तरुणाईत सध्या ‘इन’ आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे लक्षात ठेवा...
चनियाचोळी घेताना जरीकामापेक्षा मोठ्या मोत्यांची डिझाइन्स आणि गडद रंग घ्या. असेच रंग रात्रीच्या दांडियामध्ये उठून दिसतात. 
यावर गळ्यातले आणि मोठे कानातले घाला; कारण चनियाचोळीच्या ओढणीमधून हे मोठे दागिनेच उठून दिसतात. 
काही ठिकाणी भाड्यानेही असे पेहराव मिळतात; पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य काळजी घेत आणि गरज असल्यासच हे पेहराव घ्या.
सध्या डिझायनर मास्क बाजारात पाहायला मिळत आहेत. एक छानसा मॅचिंग मास्क घातल्यास तुमचा लुक मेंटेन राहू शकतो.
चनियाचोळीमध्ये कम्फर्टेबल नसणाऱ्या मुली भरलेला कुर्ता-पायजमा आणि गुजराती पद्धतीच्या गोल; पण भरलेल्या साड्याही वापरू शकतात. 
गरबा किंवा दांडिया खेळताना सुरक्षित अंतर राखा. मास्क खाली येणार नाही, याचीही काळजी घ्या. खेळताना दम लागू शकतो, अशा वेळेस थोडे लांब जाऊन एकटे असाल अशा ठिकाणी मास्क खाली घेऊन श्‍वास नॉर्मल होईपर्यंत थांबा. 
दांडिया खेळण्यासाठी डिझायनर पीपीई किटदेखील बाजारात आणि ऑनलाइन उपलब्ध आहेत. साधारणतः ३०० रुपयांपासून हे किट मिळतात.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about social distance navratrotsav