कंफर्ट की सवारी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

बाइक्स चालवताना मजा येत असली, तरी तिच्यातून मोठं सामान नेता येत नाही, किंवा पाठीवर ताण येतो हेही खरंच. त्यामुळे अनेक तरुण मंडळी स्कूटरेट्सनाही पसंती देताना दिसतात.

तरुणाईला बाइक्सचं, वेगाचं आकर्षण असतं यात काही वादच नाही; पण ‘शान की सवारी’ करत असतानाच ‘कंफर्ट की सवारी’ हेही तितकंच महत्त्वाचं, नाही का? बाइक्स चालवताना मजा येत असली, तरी तिच्यातून मोठं सामान नेता येत नाही, किंवा पाठीवर ताण येतो हेही खरंच. त्यामुळे अनेक तरुण मंडळी स्कूटरेट्सनाही पसंती देताना दिसतात.

प्रॅक्टिकल्स असोत किंवा इतर गोष्टी असतो, त्यावेळी सामान खूप न्यावं लागतं. त्यात स्कूटरेट्स उपयुक्त ठरतात. शिवाय अनेक कंपन्यांनी आता स्कूटरेट्सनाही अतिशय शानदार पद्धतीनं सादर केलं आहे. गिअर पायात नसल्यानं पाय मोकळे राहतात हा त्यांचा एक मोठा फायदा. शिवाय कंपन्यांनी या स्कूटरेट्सचा लूक, मायलेज आणि कंफर्ट या सगळ्या गोष्टी खूप सुधारल्या आहेत. त्यामुळे स्कूटरेट्सचीही क्रेझ वाढताना दिसत आहे. अशाच काही स्कूटरेट्सवर आपण नजर टाकू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about young generation prefer scooters

Tags
टॉपिकस
Topic Tags: