
गेल्या काही वर्षांपासून सेकंड हॅण्ड अथवा वापरलेल्या कारची बाजारपेठ विस्तारताना पाहायला मिळत आहे. अनेकांचे बजेट कमी असल्याने सेकंड हॅण्ड कार खरेदी करतात. काही नवशिके कार चालवण्याचा सराव व्हावा म्हणून जुनी कार विकत घेण्यास प्राधान्य देतात. सेकंड हॅण्ड कार विकत घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक ठरते. याविषयी टिप्स...
गेल्या काही वर्षांपासून सेकंड हॅण्ड अथवा वापरलेल्या कारची बाजारपेठ विस्तारताना पाहायला मिळत आहे. अनेकांचे बजेट कमी असल्याने सेकंड हॅण्ड कार खरेदी करतात. काही नवशिके कार चालवण्याचा सराव व्हावा म्हणून जुनी कार विकत घेण्यास प्राधान्य देतात. सेकंड हॅण्ड कार विकत घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक ठरते. याविषयी टिप्स...
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
1) बजेट ठरवा
कार खरेदी करण्यापूर्वी आपले बजेट म्हणजेच आपण किती पैसे खर्च करू शकतो, याचा विचार करा. बजेट ठरल्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता की, या पैशात कोणती कार घेता येऊ शकते. सेकंड हॅण्ड कार खरेदी केल्यानंतर तिच्यावर थोडा आणखी खर्च होऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा.
2) कारची निवड
कार खरेदीसाठी बजेट फिक्स झाल्यानंतर कोणत्या कंपनीची कोणती कार खरेदी करायची आहे, याचा निर्णय घ्या. याचसोबत कोणते व्हेरियंट हवे हेही पाहा. सेकंड हॅण्ड कार बाजारात सेदान, हॅचबॅक, एसयूव्ही, कॉम्पॅक्ट एसयूव्ही या सर्व प्रकारच्या कार उपलब्ध असतात. आपण निवडलेल्या मॉडेलची माहिती जमा करा. अन्य मॉडेलचा पर्याय समोर ठेवा.
3) योग्य वितरकाची निवड
ओळखीच्या वितरकाकडून किंवा ओनरकडून थेट कार खरेदी करावी. अनेक कंपन्यांचे यूज्ड कार प्लॅटफॉर्म किंवा शोरूम आहेत. ओएलएक्स, क्विकर असे अन्य प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे सर्वांत आधी दोन तीन वितरकांकडे आपण निवडलेल्या मॉडेलबाबत चर्चा करा. कारचे मॉडेल, किंमत आणि त्यानंतर कारच्या कागदपत्रांबाबत विचारणा करा.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
4) इंटेरिअर, इंजिनची तपासणी
कारचे इंटेरिअर आणि एक्सटिरियर नीट पाहून घ्या. कारला कोणता अपघात नाही झाला नाही, हेही तपासावे. गाडीचा रंग, टायर, बॅटरी, डेंट, स्क्रॅच, सीट, गाडी किती किलोमीटर चालली आहे, या मुख्य बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्या. यासह इंजिन ठीक काम करत आहे ना, आवाज करत नाही ना, मायलेज किती आहे याकडेही लक्ष द्या.
5) टेस्ट ड्राइव्ह
सेकंड हॅण्ड कार घेताना टेस्ट ड्राइव्ह घ्या. ती किमान १० किलोमीटरची असावी. कारचे सर्व फिचर्स, स्विच, बटण, ब्रेक, क्लच, गिअर, एक्सिलेटर नीट काम करत आहे ना, हे दोन तीन वेळा तपासून पाहा.
6) व्हॅल्यू ठरविणे
कारचे सर्व्हिस रेकॉर्ड, रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स तपासून घ्या. आरसीची सत्यप्रत मागून घ्या. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर तुम्ही कारची किंमत ठरवा. आपले बजेट आहे त्याच किमतीत बोलणी करा. खरेदी करताना करारपत्र नक्की तयार करा. गाडीच्या बिलाची सत्यप्रत आपल्या जवळ ठेवा. यामध्ये इंजिन क्रमांक, चेसीस नंबर, डिलिव्हरीची तारीख असते.