झूम : कल्पकतेची चाकं

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

सायकली म्हणजे दोन चाकं आणि त्यांना साखळीनं जोडणारा सांगाडा एवढंच समीकरण आता राहिलेलं नाही मंडळी. सायकलींमध्ये इतके नावीन्यपूर्ण प्रयोग जगभरात सुरू आहेत, की बघणाऱ्यांनी तोंडात बोटं घालावीत. अशाच काही सायकलींची आणि त्यातल्या नावीन्याची माहिती आपण घेऊया.

सायकली म्हणजे दोन चाकं आणि त्यांना साखळीनं जोडणारा सांगाडा एवढंच समीकरण आता राहिलेलं नाही मंडळी. सायकलींमध्ये इतके नावीन्यपूर्ण प्रयोग जगभरात सुरू आहेत, की बघणाऱ्यांनी तोंडात बोटं घालावीत. अशाच काही सायकलींची आणि त्यातल्या नावीन्याची माहिती आपण घेऊया.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फोल्ड करता येणारं चाक
फोल्ड करता येणारी सायकल हे आता तितकं आश्चर्य राहिलेलं नाही. मात्र, सायकली कितीही फोल्ड करता येत असल्या, तरी त्यांचं चाक फोल्ड करता येत नाही हा प्रॉब्लेम आहेच. जर्मन डिझायनर अँड्री मोसेलिन यांनी मात्र त्यावर उपाय शोधला बरंका. त्यांनी ‘रिव्हॉल्व्ह’ या सायकलीची रचना केली आहे. तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं चाक एक तृतीयांश फोल्ड करता येतं. ते पुन्हा मूळ आकारात आणणं हा भागही अगदी सोपा. फोल्ड होणाऱ्या अनेक सायकलींमध्ये चाकं एक तर खूप लहान किंवा विचित्र असतात, ही गोष्ट मोसेलिन यांना खटकत होती. त्यामुळे त्यांनी तीन वर्षं संशोधन करून ही सायकल तयार केली. तूर्त या सायकलीचं व्यापक व्यावसायिक स्तरावर उत्पादन होत नसलं, तरी हे तंत्रज्ञान भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे असा विश्वास मोसेलिन यांनी व्यक्त केला आहे.  

मालवाहू सायकल
सायकलला चक्क मालगाडीसारखा मालवाहू ट्रेलर जोडला तर? येस, असा एक प्रयोग जर्मनीतल्याच ट्रेनक्स नावाच्या कंपनीनं केला आहे. त्यांनी सायकलला जोडता येईल असा एक ट्रेलर तयार केला आहे. त्यात सामान ठेवता येतं. सामान म्हणजे तरी किती? तर तब्बल चाळीस किलोंपर्यंत. एवढं सामान ठेवूनसुद्धा ही सायकल विनसायास चालवता येते-कारण तिची रचनाच तशी आहे. विशेष म्हणजे जेव्हा सामान नसेल, तेव्हा हा जोडलेला ट्रेलर पुन्हा फोल्ड करून ठेवता येतो. मागच्या चाकावर हा फोल्ड केलेला ट्रेलर छान मावतो. ही सायकलही अजून प्रयोगाच्या स्तरावरच आहे. 

दोन दोन चाकांची मजा
सायकलींचा वापर कसा असतो त्यानुसार टायरची प्रत ठरत असते. तुम्ही सायकल घेऊन ट्रेकिंगला जाणार असलात, तर तुम्हाला जास्त ताकदवान, जाड टायर लागतील. ‘रिटायर’ नावाच्या कंपनीनं अशी दोन्ही टायर एकाच सायकलमध्ये दिली आहेत. शहरातल्या प्रवासासाठी साधी चाकं आणि ट्रेकिंगसाठी त्याच चाकांवर टायरचं कव्हर लावलं, की एकदम वेगळ्याच प्रकारचं चाक तयार होणार. झिपचा वापर करून दुसरं कव्हर लावलं, की चाकाची ताकद वाढणार. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on cycle

Tags
टॉपिकस
Topic Tags: