दिल तो बच्चा है! : म्हणून दारूचे कडवट घोट घेतले!

नितीन थोरात
बुधवार, 15 जुलै 2020

‘गण्या तुला नाय वाटत का तू जरा जास्तच दारू पेतोय?’
‘नाय लका, उलट मी जास्त दारू पेतोय म्हणून तर मी अजून कोरोना निगेटिव्ह राहिलोय. तुला माहितीये का, रोज मी कमीत कमी पन्नास पेंशटच्या घशातलं सॅम्पल लॅबला पाठवतोय. आजवर सहाशे पॉझिटिव्ह पेशंट तपासलेत. तरीबी अजून निगेटिव्ह राहिलोय. कशामुळं? तर दारूमुळं. आरं आजवर साऱ्या दुनियेनी दारूला नावं ठेवली. पण, आज तीच दारू आपला जीव वाचवायला उपयोगी पडतीये का नाय?’

‘गण्या तुला नाय वाटत का तू जरा जास्तच दारू पेतोय?’
‘नाय लका, उलट मी जास्त दारू पेतोय म्हणून तर मी अजून कोरोना निगेटिव्ह राहिलोय. तुला माहितीये का, रोज मी कमीत कमी पन्नास पेंशटच्या घशातलं सॅम्पल लॅबला पाठवतोय. आजवर सहाशे पॉझिटिव्ह पेशंट तपासलेत. तरीबी अजून निगेटिव्ह राहिलोय. कशामुळं? तर दारूमुळं. आरं आजवर साऱ्या दुनियेनी दारूला नावं ठेवली. पण, आज तीच दारू आपला जीव वाचवायला उपयोगी पडतीये का नाय?’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गण्याच्या या वाक्‍यावर मान डुलवत मी दारूचा घोट घशाखाली ढकलला.
माझ्या घराशेजारी कोरोना पेशंट सापडला. त्यामुळं टेंशन आलं होतं. त्या टेंशनमध्ये मी गण्याला फोन केला. तो म्हणाला, फोर व्हीलर घे. मी खंबा आणतो. घाटाच्या वरती जाऊ. एका झाडाखाली गाडी लावून निवांत चर्चा करू. त्यानुसार दारूचे घोट घेत, शेव खात आम्ही जागतिक महामारीपासून अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर गंभीर चर्चा करू लागलो. 

गण्या म्हणाला, ‘नित्या, पूर्वी लोकं दारू फक्त स्वत:च्या आनंदासाठी पेत होते. आता आपण आपल्या कुटुंबासाठी प्यायला हवी. सॅनिटायझर लावून आपण फक्त हात स्वच्छ ठेवू शकतो. पण, आतल्या बॉडीचं काय? चुकून कोरोना आत पोचला तर आपण मरणार. शिवाय आपली फॅमिलीबी जीवानिशी जाणार. पोटातला कोरोना मरावा आणि आपली फॅमिली सुरक्षित रहावी, म्हणून तरी आपण दारू प्यायला पाहिजे.’
होकार देत मी पुढचा पेग भरला. 

गण्या म्हणाला, ‘नित्या, आपण या समाजाचं देणं लागतो. समाज सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित, समाज सुरक्षित तर देश सुरक्षित. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला दीर्घायुष्य लाभावं आणि पोटातला कोरोना पोटातच मरून जावा, यासाठी आपण हे कडवट घोट रिचवलेच पाहिजेत राव.’
गण्याच्या या वाक्‍यावर मी डोळे झाकून पुढचे घोट घेतले. डोकं जड होऊ लागलं होतं. पण, गण्याला चांगली किक बसलेली. 

तो म्हणाला, ‘भावा तुला माहितीये, लॉकडाउनमधीपण दारूची दुकानं उघडली. डब्लूएचओलाबी दारूचं महत्त्व पटलं. पण, माझ्या बायकुला अजून महत्त्व कळाना. रोज भांडती. मी दारू पेतो तिच्यासाठी. मी दारू पेतो माझ्या लेकरांसाठी. मला काय हौसहे व्हय, हे असलं घाणेरडं प्यायची? रोज आठशे रुपायचा चुराडा करायची? पण, मला कुणी समजूनच घेत नाय रं...’

गण्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. नाका-डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. पण, त्याचे डोळे कुठं आहेत, नाक कुठं आहे, अश्रू कुठंय याचा मला मेळ बसत नव्हता. इतक्‍यात बायकुचा फोन आला. मी फोन कानाला लावला. बायकोचं बोलणं ऐकून घेतलं आणि काही न बोलता मोबाईल समोर ठेवून दिला. गण्यानं प्रश्‍नार्थक चेहऱ्यानं माझ्याकडं पाहिलं. मी म्हणालो, ‘आरं कोणता तरी पाहुणा मेला म्हणत होती. किडनी फेल झालती त्याची दारू पिऊ पिऊ. दारू लय वाईट असती लका. जरा मापातच प्यायला पाहिजे.’ तसा गण्या म्हणाला, ‘अ... लका नित्या, पाहुणा मेला म्हणू नको. या समाजाला वाचवता वाचवता त्यानं आपल्या प्राणाचा त्याग केलाय.

दोन मिनिट उभं राहून आपण त्याला श्रद्धांजली वाहिली पाहिजे.’ गण्याचं म्हणणं मला पटलं. दोघंही डुलत डुलत गाडीतून बाहेर आलो तोल सावरत खिन्न मनाने श्रद्धांजली वाहू लागलो. 

रविवारी मी आणि गण्या त्या पाहुण्याच्या दहाव्याला गेलो होतो. तिथं त्या पाहुण्याची बायको मुसमुसत होती. तिची दोन तान्ही लेकरं तिला कवटाळून बसलेली. बायकु दारूच्या नावानं शिव्या हासडत होती. ना गण्या माझ्याकडं पाहू शकत होता ना मी त्याच्याकडं.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nitin thorat on Liquor

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: