गॅजेट्स - परवडणाऱ्या मोबाईलची स्पर्धा

ऋषिराज तायडे
Tuesday, 31 March 2020

सध्या बाजारपेठेत दर आठवड्याला नवनवीन मोबाईल सादर केले जात आहेत. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उत्तमोत्तम सुविधा देण्याकडे मोबाईल कंपन्यांचा कल आहे. साधारणतः जादा बॅटरी, चांगला कॅमेरा आणि वाजवी किंमत ही सर्वसामान्य ग्राहकांची अपेक्षा लक्षात घेऊन १५ हजार रुपयांपर्यंत अनेक मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी सॅमसंग, रिअलमी, ओप्पो, पोको, रेडमी आदी कंपन्यांच्या मोबाईलला ग्राहकांची चांगली मागणी आहे. त्यापैकी सॅमसंग गॅलेक्सी एम-२१, रिअलमी-६ आणि ओप्पो ए-९ बद्दल आज जाणून घेऊया...

सॅमसंग गॅलेक्सी एम-२१

 • डिस्प्ले : ६.४ इंच SuperAMOLED डिस्प्ले
 • प्रोसेसर : सॅमसंग एक्सीनॉस ९६११ प्रोसेसर
 • रॅम : ४GB/६GB
 • मेमरी: ६४ GB/१२८ GB (५१२ GB पर्यंत एक्स्पांडेबल मेमरी)
 • बॅक कॅमेरा : ४८ MP + ८ MP + ५ MP
 • फ्रंट कॅमेरा : २० MP
 • बॅटरी : ६००० mAh बॅटरीसह १५W फास्ट चार्जिंग
 • ऑपरेटिंग सिस्टिम : वनयूआय बेस्ड अॅण्ड्रॉईड १०
 • किंमत - ४ GB + ६४ GB  १२,९९९ रुपये, ६ GB+१२८ GB  १४,९९९ रुपये

रिअलमी-६
मीडियम प्राईस सेगमेंटमध्ये रिअलमीच्या रिअलमी-६ मोबाईलचीही डिजिटल बाजारात चांगलीच चर्चा आहे. ४ जीबी रॅमसह ६४ जीबी मालिकेतील हा मोबाईल १३ हजार रुपयांना उपलब्ध आहे.  

 • डिस्प्ले : ६.५ इंच फुल एचडी डिस्प्ले
 • प्रोसेसर : मीडियाटेक हॅलो G९०T प्रोसेसर
 • रॅम : ४ GB + ६ GB + ८ GB
 • मेमरी : ६४ GB +१२८ GB
 • कॅमेरा : ४८ MP + ८ MP + २ MP + २ MP
 • फ्रंट कॅमेरा : १६ MP
 • बॅटरी : ४५०० mAh बॅटरीसह २७W फास्ट चार्जिंग
 • ऑपरेटिंग सिस्टिम : यूआय बेस्ड अॅण्ड्रॉईड १०
 • किंमत - ४ GB + ६४ GB  १२,९९९ रुपये, ६ GB+१२८ GB  १४,९९९ रुपये, ८ GB+१२८ GB  १५,९९९ रुपये

ओप्पो ए-९

 • डिस्प्ले : ६.५ इंच फुल एचडी डिस्प्ले
 • प्रोसेसर : क्वालकॉम SM६१२५ प्रोसेसर
 • रॅम : ४ GB+८ GB
 • मेमरी : १२८ GB
 • कॅमेरा : ४८ MP + ८ MP + २ MP + २ MP
 • फ्रंट कॅमेरा : १६ MP
 • बॅटरी : ५००० mAh  
 • ऑपरेटिंग सिस्टिम : यूआय बेस्ड अॅण्ड्रॉईड १०
 • किंमत - ४ GB + १२८ GB १४९९० रुपये, ८ GB+१२८ GB  १९९९० रुपये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Rushiraj Tayade on Affordable mobile competition