गॅजेट्स : आव्वाज कुणाचा!

ऋषिराज तायडे
Wednesday, 28 October 2020

संगीत न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हल्ली तर गाणी ऐकण्यासाठी वेगवेगळ्या हेडफोन्सचा वापर होत आहे. सुरुवातीला वायर्ड हेडफोनची मोठी क्रेझ होती. मात्र, हळूहळू ब्लूटूथ हेडफोन ते इअरबड्सपर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या काही खास इअरबड्सबाबत....

संगीत न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हल्ली तर गाणी ऐकण्यासाठी वेगवेगळ्या हेडफोन्सचा वापर होत आहे. सुरुवातीला वायर्ड हेडफोनची मोठी क्रेझ होती. मात्र, हळूहळू ब्लूटूथ हेडफोन ते इअरबड्सपर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या काही खास इअरबड्सबाबत....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोट एअरडोप्स  201T
ब्ल्यूटूथ व्ही.५.० फीचरने सुसज्ज असलेल्या या हेडफोन्समध्ये दमदार संगीताची अनुभूती तुम्हाला मिळू शकेल. इंटिग्रेटेड कन्ट्रोलसह व्हॉईस असिस्टंटचीही सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. केवळ एका बटनावरून तुम्हाला सर्व काही अॅक्सेस करता येते. विशेष फायबरने तयार केलेले हे इअरबड्स पाण्यापासून तसेच घामापासून सुरक्षित आहे. ४७० एमएएचच्या बॅटरीमुळे एका चार्जिंगमध्ये सलग तीन तास या इअरबड्समध्ये गाणी ऐकता येतात. विविध ई-कॉमर्स संकेतस्थळावर या  इररबड्सची किंमत १४०० ते १५०० रुपये आहे.

रेडमी इअरबड्स एस
शाओमी या ब्रॅण्डने आणलेले हे खास इअरबड्स सर्वच कंपनीच्या मोबाईलला जोडता येतात. उत्तम डिझाईन आणि स्टायलिश लुकमुळे हे इअरबड्स सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अवघ्या ४.१ ग्रॅम वजन असल्याने ते कितीही वेळ कानात असले, तरीही त्याचा कोणताही त्रास होत नाही. एकावेळच्या चार्जिगमध्ये हे इअरबड्स सलग चार तास चालू शकतात. हे इअरबड्स पाणी आणि घामापासून खराब होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. विविध ई-कॉमर्स संकेतस्थळावर या इअरबड्सची किंमत १४९९ रुपये आहे.

पिट्रॉन बासबड्स
पिट्रॉन कंपनीने सादर केलेले खास इअरबड्स ब्लूटूथ ५.०, सहा तासांचा प्ले बॅक टाम, चार्जिंग केससह वीस तासांची कार्यक्षमता आणि १०० तास स्टॅँडबाय मोडवर राहू शकतो. १० मीटर वायरलेस रेंज, व्हाईस असिस्टंट सपोर्ट, ४०० एमएएच बॅटरी क्षमता आदी सुविधा या इअरबड्समध्ये दिली आहे. हँड्सफ्री म्युझिक आणि फोन मॅनेजमेंटसह संगीताचा उत्तम आनंद ग्राहकांना घेता येईल. या इअरबड्सची ई-कॉमर्स संकेतस्थळावरील किंमत १००० रुपये आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rushiraj tayade on headphone