गॅजेट्स : मोबाईल हरवलाय? असा करा डेटा डिलीट....

ऋषिराज तायडे
Wednesday, 4 November 2020

हल्ली मोबाईल म्हणजे आपल्यासाठी सर्वकाही झाले आहे. पूर्वी केवळ फोन करणे किंवा संदेश पाठवणे इथपर्यंत मर्यादित असलेला मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. कार्यालयीन, व्यावसायिक, आर्थिक आदी सर्व कामे हातातल्या मोबाईलवर केले जाऊ लागले. एवढेच नव्हे, तर तुमचे खासगी आयुष्यही मोबाईलमध्ये गुरफटले गेले आहे.

हल्ली मोबाईल म्हणजे आपल्यासाठी सर्वकाही झाले आहे. पूर्वी केवळ फोन करणे किंवा संदेश पाठवणे इथपर्यंत मर्यादित असलेला मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. कार्यालयीन, व्यावसायिक, आर्थिक आदी सर्व कामे हातातल्या मोबाईलवर केले जाऊ लागले. एवढेच नव्हे, तर तुमचे खासगी आयुष्यही मोबाईलमध्ये गुरफटले गेले आहे. मात्र, मोबाईल हरवल्यास महत्त्वाचा सर्व डेटा आणि खासगी माहिती इतरांच्या हाती लागण्याची शक्‍यता असते. मात्र, आता काळजी करण्याचे कारण नसून तुमच्या हरवलेल्या मोबाईलमधील डेटा डिलीट करता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया

  • हरवलेल्या ॲण्ड्रॉइड मोबाईलचा शोध घेण्यासाठी तसेच त्यातील डेटा डिलीट करण्यासाठी दुसऱ्या ॲण्ड्रॉइड मोबाईलवर ‘ॲण्ड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर’ ॲप इन्स्टॉल करा. 
  • दुसरा ॲण्ड्रॉइड मोबाईल नसल्यास संगणकावर किंवा लॅपटॉपवर android.com/find या संकेतस्थळावर जाऊन जी-मेल अथवा गुगल अकाउंटला लॉगइन करावे लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे, हरवलेल्या मोबाईलमधील गुगल अकाउंट आणि तुम्ही आता लॉगइन करत असलेला अकाउंट सारखे असणे गरजेचे आहे. 
  • लॉगइन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हरवलेल्या अथवा ज्या मोबाईलमध्ये तुमचे गुगल अकाउंट असेल, त्यावर एक नोटिफिकेशन जाईल आणि तुम्हाला त्याचे लोकेशनही कळेल. मोबाईल बंद असल्यास त्याचे शेवटचे लोकेशन तुम्हाला दिसेल. तसेच, तुम्हाला काही पर्यायही उपलब्ध होतील. 
  • ‘रिंग साउंड’ - या पर्यायावर क्‍लिक केल्यास तुमचा हरवलेला मोबाईल सायलेंट अथवा व्हायब्रेट मोडवर असला, तरी फोनची रिंग वाजत राहणार. 
  • ‘सिक्‍युअर डिव्हाउस’ - या पर्यायावर क्‍लिक केल्यावर मोबाईल लॉक करता येईल आणि केवळ तुम्ही सेव्ह केलेल्या पिन नंबर, लॉक पॅटर्न किंवा पासवर्डच्या मदतीनेच उघडता येईल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये लॉक पॅटर्न सेट केला नसल्यास तो करता येईल. 
  • ‘इरेज डिव्हाइस’ - या पर्यायाच्या मदतीने मोबाईलच्या अंतर्गत मेमरीत असलेला डेटा कायमस्वरूपी डिलीट करता येईल. मात्र, मेमरी कार्डवरील डेटा डिलीट करता येणार नाही.
  • ज्या व्यक्तीला तुमचा मोबाईल सापडेल, त्याला तुमचा मोबाईल परत करता यावा म्हणून तुमच्या हरवलेल्या मोबाईलच्या लॉक स्क्रीनवर संदेश पाठवून तुमचा दुसरा संपर्क क्रमांक किंवा पत्ता पाठवता येईल.
  • मोबाईल सापडल्यावर तुमचा मोबाईल पुन्हा सुरू करण्यासाठी त्याच गुगल अकाउंटने लॉगइन करावे लागेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rushiraj tayade on mobile missing data delete