गॅजेट्स : दणका आवाजाचा...

ऋषिराज तायडे
Wednesday, 25 November 2020

बदलत्या काळासोबत आपले राहणीमान व गरजेच्या वस्तूही बदलत चालल्या आहेत. पूर्वी गॅजेट म्हणून केवळ मोबाईलचाच वापर केला जात होता. मात्र, आता स्मार्टवॉच, ब्लू-टूथ हेडसेट्स, स्पीकर्सचाही वापर वाढला आहे. पर्यटनाला गेले असता, पार्टी सेलिब्रेट करताना स्पीकर्स म्हणून आता हल्ली ब्लू-टूथ स्पीकर्सचा वापर वाढला आहे. घरातही गाणी ऐकण्यासाठी स्पीकर्स वापरले जातात.

बदलत्या काळासोबत आपले राहणीमान व गरजेच्या वस्तूही बदलत चालल्या आहेत. पूर्वी गॅजेट म्हणून केवळ मोबाईलचाच वापर केला जात होता. मात्र, आता स्मार्टवॉच, ब्लू-टूथ हेडसेट्स, स्पीकर्सचाही वापर वाढला आहे. पर्यटनाला गेले असता, पार्टी सेलिब्रेट करताना स्पीकर्स म्हणून आता हल्ली ब्लू-टूथ स्पीकर्सचा वापर वाढला आहे. घरातही गाणी ऐकण्यासाठी स्पीकर्स वापरले जातात. सध्या पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत चांगल्या दर्जाचे ब्लू-टूथ स्पीकर्स बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घेऊया त्यापैकी निवडक स्पीकर्सबाबत...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोट स्टोन ६५०
हा १० वॉट क्षमतेचा ब्लू-टूथ स्पीकर ब्लू-टूथ व्ही ४.२सह दहा मीटरच्या क्षेत्रात काम करतो. त्यासोबतच ऑक्स केबल, तसेच एसडी कार्डनेही हा स्पीकर जोडता येतो. दीर्घकाळ चालणाऱ्या १८०० एमएएच बॅटरीमुळे हा स्पीकर सलग सात तासांपर्यत चालू शकतो आणि ही बॅटरी अवघ्या २.५ तासांत पूर्णपणे चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. उत्कृष्ट रचनेमुळे हा स्पीकर पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. तसेच, या स्पीकरमध्ये माइकचीही सुविधा दिली आहे. तीन रंगांमध्ये उपलब्ध असलेला हा स्पीकर ई-कॉमर्स संकेतस्थळावर दोन हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

मिवी मूनस्टोन
सुपर सॉलिड बाससह दर्जेदार आवाज आणि दमदार परफॉर्मन्समुळे या स्पीकरला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. टचस्क्रीन अडाप्टिव्ह कन्ट्रोल्समुळे हा स्पीकर हाताळायला खूपच सोपा आहे. दोन स्पीकर्स एकत्र वापरल्यास मिळणारी अनुभूती ही अवर्णनीयच म्हणता येईल. आयपीएक्स ५ डिझाइनमुळे हा स्पीकर डस्ट आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. यातील लिथिअम आयन बॅटरीमुळे हा स्पीकर सलग सहा तास चालू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळावर या स्पीकरची किंमत १६९९ रुपये आहे.

जेबीएल गो २
हेडफोन्स, इअरबड्स, स्पीकर्सच्या बाजारात अग्रणी आणि नावाजलेली कंपनी म्हणजे जेबीएल. जेबीएलच्या सर्वच उत्पादनांना ग्राहकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. ब्लू-टूथ स्पीकर्समध्ये ‘जेबीएल गो २’ या स्पीकरची सर्वाधिक चर्चा असते. जेबीएलच्या सिग्नेचरसह दणक्यात वाजणाऱ्या या स्पीकरमध्ये लिथिअम पॉलिमर बॅटरीचा वापर केला आहे. त्यामुळे हा स्पीकर पाच तास सलगपणे चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आयपीएक्स ७ वॉटरप्रूफ डिझाइनमुळे हा स्पीकर पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे. ऑडिओ केबल आणि ब्लू-टूथने हा स्पीकर विविध डिव्हाइसशी कनेक्ट करता येतो. ई-कॉमर्स संकेतस्थळांवर हा स्पीकर १८९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rushiraj tayade on speakers

Tags
टॉपिकस
Topic Tags: