esakal | फॅशन टशन : रोजच्या ब्लाउजला हटके पर्याय!
sakal

बोलून बातमी शोधा

Fashion

क्रॉप टॉपची फॅशन आता भारतामध्ये चांगलीच रुजली आहे. या फॅशनला येऊन बराच काळ झाला असला, तरी ती कुठेच मागे पडलेली नाही. नव्या प्रयोगांसह क्रॉप टॉप हे समोर येतात. प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये एकतरी क्रॉप टॉप हा असतोच. तसे पाहायला गेले तर, क्रॉप टॉप हा पूर्णपणे वेस्टर्न आहे. पण, यासोबत काहीसा वेगळा प्रयोग नक्कीच करता येईल. त्याचा वापर साडीचा ब्लाउज म्हणून करता येईल. 

फॅशन टशन : रोजच्या ब्लाउजला हटके पर्याय!

sakal_logo
By
ऋतुजा कदम

क्रॉप टॉपची फॅशन आता भारतामध्ये चांगलीच रुजली आहे. या फॅशनला येऊन बराच काळ झाला असला, तरी ती कुठेच मागे पडलेली नाही. नव्या प्रयोगांसह क्रॉप टॉप हे समोर येतात. प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये एकतरी क्रॉप टॉप हा असतोच. तसे पाहायला गेले तर, क्रॉप टॉप हा पूर्णपणे वेस्टर्न आहे. पण, यासोबत काहीसा वेगळा प्रयोग नक्कीच करता येईल. त्याचा वापर साडीचा ब्लाउज म्हणून करता येईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्रॉप टॉप 
प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये असणारा आणि रोजच्या वापरासाठी सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार म्हणजे ‘टॉप’. फॅशनमध्ये सतत काहीतरी नवीन येतच असते. क्रॉपटॉपमध्येही आता अनेक प्रकार पाहायला मिळतात. क्रॉप म्हणजेच नेहमीच्या टॉपपेक्षा कमी उंचीचा टॉप. पण, त्यामध्ये बंद गळ्याचे, मोठे गळ्याचे, स्लिव्हलेस, अखंड हाताचे आणि असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. सोशल मीडियावर क्रॉप टॉपसोबत विविध प्रकारची फॅशन आली आहे. काही सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएनर्स यांनी क्रॉपटॉपचा ब्लाउज म्हणून वापर केला आणि एका वेगळ्या फॅशनशी ओळख करून दिली.

अशी करा फॅशन…

  • क्रॉप टॉप शक्यतो कोणत्याही एकाच रंगाचा निवडा. जेणेकरून तो साडीसोबत जुळून येईल. साडी एका रंगाची आणि प्लेन असल्यास प्रिंट, डिझाइनचा क्रॉपटॉप वापरू शकता.
  • काळा आणि पांढरा हे दोन रंग साधारण सर्व रंगाच्या साड्यांवर शोभून दिसतात.
  • ऑफशोल्डर, फुल स्लिव्हस, हायनेक हे काही मुख्य प्रकार आहेत ज्यांना ब्लाऊजसाठी पसंती आहे. हे प्रकार ट्रेंडिगमध्ये आहेत. 
  • क्रॉप टॉपमुळे येणारा फ्युजन लूक सर्वांपेक्षा वेगळं दिसण्यास मदत करेल. पारंपरिक साडीचोळीला काहीसा हटके लूक मिळेल.
  • साडीच्या रंगाप्रमाणे दागिने घालावे. ऑक्सिडाईज ज्वेलरी यावर शोभून दिसेल. मोठे गळ्यातले किंवा लोंबणारे कानातले लूक पूर्ण करतील.

Edited By - Prashant Patil