फॅशन टशन : जुन्याचं सोनं करणारा खण! 

Khan-Saree
Khan-Saree

धारवाडी खणाला पहिली पसंती मिळाली ती उत्तर कर्नाटकातील स्त्रियांची! या सुती रेशीम शुद्ध हाताने विणलेल्या कापडाचा उपयोग तेथील महिला फक्त ब्लाऊज शिवण्यासाठी करीत असत. इरकलची साडी आणि खणाचा ब्लाऊज हा तिथल्या स्त्रियांचा पेहराव प्रसिद्ध होता. तसेच, धारवाडी खणाचे लहान मुलींचे परकर-पोलकी हा प्रकारही खूप पाहायला मिळायचा. सध्या ‘जुनं ते सोनं’ या म्हणीवर पुन्हा एकदा याच खणाची फॅशन ट्रेंडमध्ये आली आहे. खण हा प्रकार आता फक्त चोळी म्हणजेच ब्लाऊजपर्यंत मर्यादित न राहता साडी, बॅग, पाऊच आदींमध्येही आला आहे. सध्या साडीमध्ये काळा आणि राखाडी रंग ट्रेंडमध्ये आहे. यावर ऑक्सडाईज ज्वेलरी घातल्यास वेगळाच ट्रेंडी लुक मिळतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • खणाची साडी, वनपीस, ड्रेस, कुर्ता सध्या ट्रेंडमध्ये आहेत. विशेष म्हणजे, खण कोणत्याही रंगावर खुलून दिसतात. 
  • यावर चंद्रकोर, पारंपरिक ज्वेलरी, नथ किंवा नोजपिन, मोत्यांच्या बांगड्या तुम्हाला पारंपरिक लुक देतील. 
  • सध्या बाजारात प्लेन खणाच्या साड्याही मिळतात. हे खण आपल्याला हवे तसे वापरता येतात. यावर आपल्याला आवडेल अशी नथ, चंद्रकोर, मुखवटा आदीची एम्ब्रॉयडरी साडी तसेच ब्लाऊजच्या मागे आणि हातावर तयार करून घेऊ शकता. बाजारात अनेक ठिकाणी आपल्याला अशी डिझाइन करून देणारे मिळतील. 
  • खणाचा कुर्ता किंवा वनपीस घालायचा असल्यास रेडीमेड न घेता खणाचे कापड किंवा साडी घेऊन तो शिवून घ्यावा. यामुळे आपल्याला त्यावर हवी तशी डिझाइन तर करून घेता येतेच, तसेच आपला पॅटर्न युनिक राहतो. 
  • खणासोबतच ऑक्सडाईज ज्वेलरीदेखील ट्रेंडमध्ये आहे. सिल्व्हर बॉर्डर असलेल्या खणावर तुम्ही अशाप्रकारची ज्वेलरी घालू शकता.
  • खणाचे कापड जादाचे असल्यास, त्यातून एखादी छोटी बॅग शिवून घेऊ शकता. ते शक्य नसल्यास बाजारात रेडीमेडही अशा बॅगा पाहायला मिळतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि या काळातही ट्रेंडी राहण्यासाठी तुम्ही खणाचे मास्क वापरू शकता. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com