झूम... : तुम्ही सर्व्हिसिंग नियमित करता का?

Vehicle-Servicing
Vehicle-Servicing

बाइक किंवा स्कूटरची शानदार राइड घेणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं; पण त्यासाठी आपणही काही काळजी घेतली पाहिजे बरं का. टू-व्हीलरचा नियमित मेंटेनन्स ठेवणं; म्हणजे हवा योग्य आहे की नाही इथपासून वेगवेगळ्या गोष्टींची खातरजमा करत राहणं, हे गरजेचं आहेच; पण प्रत्येक गोष्ट आपण स्वतः करू शकत नाही मंडळी. त्यासाठी व्यावसायिक मंडळींचीही मदत घेतली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर, बाइक सर्व्हिसिंगसाठी कुशल मेकॅनिककडं देणं अतिशय आवश्यक आहे.

सर्व्हिसिंगमध्ये ते मेकॅनिक इंजिन ऑईलपासून बॅटरीपर्यंत प्रत्येक गोष्टी चेक करतात, दुरुस्त करतात. त्यामुळं गाडी जास्त काळ टिकू शकते आणि तिचा परफॉर्मन्सही वाढतो. नियमित सर्व्हिसिंगमुळं गाडी ऐन वेळी दगा देण्याची भीतीसुद्धा कमी होण्यास मदत होते. सर्व्हिसिंगबाबत काही कानमंत्र आपण बघूया. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • बाइक किमान सहा-आठ महिन्यांतून सर्व्हिसिंगला द्या. अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरकडून शक्यतो सर्व्हिसिंग करून घ्यावं. त्यात पैसे तुलनेनं जास्त द्यावे लागतात ही गोष्ट खरी असली, तरी त्यात मेकॅनिक प्रमाणित असल्यामुळं सर्व्हिसिंगचा दर्जाही खूप चांगला असतो. खासगी मेकॅनिककडूनच सर्व्हिसिंग करून घ्यायचं असेल, तर शक्यतो तुमच्या घराच्या परिसरातल्या आणि इतरांकडून खात्री झालेल्या मेकॅनिक्सना प्राधान्य द्या. 
  • अधिकृत सेंटर्समधले किंवा खासगी मेकॅनिकही सर्व्हिसिंगचं वेळापत्रक देत असतात. त्याचं व्यवस्थित पालन करण्याची काळजी घ्या. खूप गॅपनंतर सर्व्हिसिंगसाठी गेलात, तर खर्च जास्त होतो आणि काही सुटे भाग दुरुस्त होण्याची शक्यताही नष्ट होऊ शकते. 
  •  ऐन वेळी एखादी गोष्ट त्या मेकॅनिकला सांगताना विसरली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व्हिसिंगसाठी जाण्यापूर्वीच आपल्याला कोणत्या समस्या भेडसावत आहेत त्या एका कागदावर लिहून ठेवा. 
  • शक्यतो त्या सर्व्हिसिंग सेंटरकडून जॉब कार्ड वापरले जात असल्याची खात्री करून घ्या. त्यामुळे त्या गोष्टी नक्की दुरुस्त होण्याची हमी मिळते. 
  • टू-व्हीलरमध्ये काही विशिष्ट प्रॉब्लेम जाणवत असतील, तर त्या मेकॅनिकबरोबर किंवा वेहिकल इन्स्पेक्टरबरोबर एक राइड घेऊन त्यांना तो समजावून सांगा. त्यामुळे तो नेमक्या रितीनं दुरुस्त करून दिला जाईल. 
  • अनेकदा सर्व्हिसिंगदरम्यान काही पार्ट्‌स बदलण्याचा प्रस्ताव दिला जातो. तो लगेच मान्य करू नका. थोडा विचार करून, चार ठिकाणी चौकशी करूनच त्याला होकार द्या. 
  • सर्व्हिसिंगला सुरवात करण्यापूर्वीच एस्टिमेट मागून घ्या. त्या खर्चात थोडा फार फरक नंतर पडू शकतो; पण आपल्याला साधारण किती खर्च येईल त्याचा अंदाज येतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com