ऑगमेंटेड रिऍलिटी इन प्रिंटिंग टेकनॉलॉजि

ऑगमेंटेड रिऍलिटी इन प्रिंटिंग टेकनॉलॉजि
Author

प्राध्यापिका लक्ष्मी ज्ञानेश्वर सपकाळ

मुद्रण व्यवसाया मध्ये ऑगमेंटेड रिऍलिटी चे वाढते महत्व:

मुद्रण व्यवसायाला खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच बराचस क्रेडिट डॉ. जोहान्स गुटेनबर्ग यांना जात, जे मुद्रण व्यवसायाचे जनक होत. त्यात भर म्हणून आज ऑगमेंटेड रिऍलिटी टेकनॉलॉजि मुद्रण विभागात महत्वाचा भाग होत आहे. आज यंत्र प्रशिक्षण घेताना अनुभवी प्रशिक्षक असतानाही प्रशिक्षणार्थी ला यंत्राचा अभ्यास करणे कठीण जाऊ शकते. पण ऑगमेंटेड रिऍलिटी टेकनॉलॉजि च्या मदतीने प्रशिक्षणाचा दर्जा सुधारत आहे व प्रिंटिंग यंत्र अधिक समजण्यास मदत होत आहे. कधी कधी यंत्राच्या अपुऱ्या माहिती मुळे वेळ आणि संसाधने वाया जातात. ऑगमेंटेड रिऍलिटी सॉफ्टवेअर मशीन लेअरनिंग अधिक सुखकर करते आणि शिकण्याची जुनी पद्धत बदलून टाकते. प्रिंटिंग मशिनरी मध्ये, ग्रेऊर, फ्लेक्सोग्राफी, ऑफसेट, स्क्रीन प्रिंटिंग या जुन्या पद्धती व्यतिरिक्त नवीन ३D प्रिंटिंग अँड डिजिटल प्रिंटिंग पद्धतीनं मध्ये सुद्धा ऑगमेंटेड रिऍलिटी चा शिरकाव झाला आहे. ऑगमेंटेड रिऍलिटी मुळे महागड्या प्रिंटिंग मशीन्स समजायला आणि वापरायला सोप्या झाल्या आहेत. मशीन्सचे वर्किंग समजण्या साठी मशीन्स चे मॅन्युअल समजून घेण्या साठी,महागडा कच्च माल न वापरता मशीन चे प्रशिक्षण घेण्यसाठी ऑगमेंटेड रिऍलिटी चा पुरे पूर वापर करता येतो. मशीन्स ची बरीचशी वैशिष्ट्ये मशीन च्या ऑपरेटर ला माहित नसतात त्यामुळे मशीन्स चा १०० % वापर होत नाही, मशीन्स चा १०० % वापर करून घेन्या साठी ऑगमेंटेड रिऍलिटी चा उपयोग होत आहे.

ऑगमेंटेड रिऍलिटी इन प्रिंटिंग टेकनॉलॉजि
अनंतराव पवार कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबीर आंबेड या गावी संपन्न.

बहुतकरून आपला जास्तीत जास्त वेळ स्क्रीन वर व्यतीत होतो. संगणक, स्मार्टफोन टेलेव्हीजण आपल्या जीवनातला महत्वाचा घटक बनले आहेत. ज्यावर आपण बातम्या, सिनेमा पाहतो आनि सोसिअल मीडिया वर सतत ऍक्टिव्ह असतो. आपण आपले ग्याजेट ज्या पद्धतीने वापरतो ती पद्धत ऑगमेंटेड अँड विरचूल रिऍलिटी तंत्रज्ञान समाविष्ट केल्या नंतर आपला विचार पूर्णपने बदलून टाकेल. ऑगमेंटेड रिऍलिटी अँड वितुअल रिऍलिटी या दोनीही टेकनॉलॉजि वेगळ्या असून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्हर्च्युअल रिऍलिटी तुम्हाला व्हर्च्युअल जगात घेऊन जाते आणि तुम्हाला रिअल वर्ल्ड चा आस्वाद देते जिथे तुम्ही जाऊ शकत नाही किंवा जाण्यास असमर्थ आहात. उदाहरणार्थ समुद्राच्या आत जे जीव राहतात त्यांची व्हर्च्युअल टूर तुम्ही करू शकता समुद्राच्या आत न जाता. व्हर्च्युअल रिऍलिटी पाण्याच्या आतील विश्व तुमच्या जवळ आणते आणि तुम्हाला खर दर्शन घडवते पाण्याच्या आतील जागाचे. व्हर्च्युअल रिऍलिटी मध्ये तुम्हाला हेड ट्रॅकिंग डिवाइस ची गरज असते. जस जशी आपण आपली मान हलवतो तसे तसे आपण व्हर्च्युअल जगाच्या आत जाऊन त्याचा आस्वाद घेत जातो. ऑगमेंटेड रिऍलिटी मध्ये हेड ट्रॅकिंग डिवाइस ची गरज लागत नाही. आपला स्मार्टफोन वापरून आपण ऑगमेंटेड रिऍलिटी तयार करू शकतो.

1960 च्या दशकात संगणक ग्राफिक्सचे सर्वेसर्वा इव्हान सदरलँड यांनी हेड माउंटेड डिव्हाइसद्वारे जगा समोर व्हर्च्युअल रिऍलिटीची कल्पना प्रस्तावित केली. ते पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी हेड मौन्टेड डिवाइस व्हर्टूल रिऍलिटी मध्ये वापरू शकतो हि संकल्पना मांडली जी पुढे जाऊन अमेरिकेच्या मिलिटरी हेलिकॉप्टर च्या वैमानिकान कडून वापरली गेली. नंतर १९९० च्या दशकात एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरर बोईंगच्या शास्त्रज्ञांनी गुंतागुंतीच्या केबल असेंब्लीमध्ये इलेक्ट्रिशियन्सना मदत करण्यासाठी ऑगमेंटेड रिऍलिटी प्रणाली विकसित केली. ज्या मध्ये एआर प्रणालीचा वापर करून ते केबल असेंब्लीमध्ये इलेक्ट्रिशियन्सना मदत करण्या साठी व्हर्च्युअल केबल असेंब्ली चे मिश्रण करून ते रिअल वर्ल्ड मध्ये प्रस्थापित केले.

शिक्षणात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विद्यार्थ्याची ज्ञान सक्रियपणे प्मिळवण्याची क्षमता वाढते आणि शिकण्याच्या आणि समजूतदारपणाच्या विधायक प्रक्रियेसाठी व्यासपीठदेखील उपलब्ध होते. सध्याच्या माहिती युगात ऑगमेंटेड रिऍलिटी (एआर) सक्रिय शिक्षण, गंभीर विचारांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, कारण तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना इमर्सिव्ह अनुभवासह आभासी जगाशी संवाद साधण्यास सक्षम करते. शिवाय, शिक्षणात एआरच्या एकत्रीकरणामुळे संशोधकाचे लक्ष एआरकडे वेधले गेले आहे, कारण त्याच्या इमर्सिव्ह निसर्गवादी अनुभवामुळे. हा पेपर ऑगमेंटेड रिऍलिटी इन एज्युकेशनच्या वापरावरील संशोधन च्या मार्गांवर साहित्याचा आढावा देतो. या पुनरावलोकनात ऑगमेंटेड रिऍलिटी ची क्षमता, विज्ञान शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण आणि जैववैद्यकीय शिक्षण यांसारख्या शिक्षण क्षेत्रात एआरचे महत्व यांचा समावेश आहे. या पुनरावलोकनात तंत्रज्ञान एकीकरणाच्या संभाव्यतेचा सारांश आहे.

ऑगमेंटेड रिऍलिटी, हे वैद्यकीय विज्ञानाचा, आणि हवाई वाहतूक उद्योग, जाहिरात उद्योग, मुद्रण उद्योग, यांचा महत्वाचा भाग होत आहे, वैद्यकीय विज्ञान, मुद्रण उद्योग, देखभाल, पर्यटन, शिक्षण, ऑटोमोबाईल उद्योग आणखी बरेच आगामी उद्योग आर च्या माध्यमातून भरभराटीस येत आहेत. येत्या काही दिवसांत अशा बऱ्याच उद्योगांन मध्ये ऑगमेंटेड रिऍलिटी चा वापर पसरणार आहे. मुद्रण(प्रिंटिंग) व्यावसायिक प्रशिक्षणा मध्ये वापरली जाणारी यंत्र सामग्री खूप महागडी आहेत आणि विद्यार्थ्यांना वास्तविक मशीनवर प्रशिक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल आवश्यक आहे. त्यामुळे महागडा कच्चा माल न वापरता त्यांना प्रत्यक्ष यंत्राचा अनुभव देणे आवश्यक आहे. ऑगमेंटेड रिऍलिटी विद्यार्थ्यांना २४ तास अधिक प्रभावी मार्गांनी नवीन पद्धती शिकण्यास मदत करून अध्यापन-शिक्षण पद्धतीचा दर्जा सुधारते. ऑगमेंटेड रिऍलिटी वैद्यकीय व्यावसायिकांना आजाराचे निदान करण्यास मदत करते. एआर तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाला प्रोत्साहन देते तसेच एआरद्वारे ठिकाणांचे सिंहावलोकन देण्यासाठी पर्यटन उद्योगात उपयोग होण्यास मदत होत आहे आणि भविष्यात आणखी मदत होईल.

ऑगमेंटेड रिऍलिटी हे वास्तविक जगात संगणक ग्राफिक्सचे अधिरोपन(सुपेरिम्पोसिशन) आहे. एआर, विरंतुअल रिऍलिटी आणि टेलिप्रेझेन्स हे तीन वेग वेगळे भाग असून ऑगमेंटेड रिऍलिटी हा दोघांच्या मधला भाग आहे. ऑगमेंटेड रिऍलिटी मध्ये 3 स्टेप्स डिझाइन करणे महत्वाचे आहे,1) वास्तविक जग आणि आभासी जग यांची सांगड घालणे 2) रिअल-टाइम आंतरक्रियाशीलता असणे 3) 3 डी मध्ये नोंदणी. व्हीआरमध्ये जिथे संगणकाद्वारे तयार केलेले आभासी जग वापरकर्त्यांना काल्पनिक जगात प्रवेश करण्यास आणि संवाद साधण्याची परवानगी देते. टेलिप्रेझेन्स वापरकर्त्यांना उपस्थित असल्यासारखे वाटून देते. टेलिप्रेझेन्स हे मानवी आणि मशीन प्रणालींचे संयोजन आहे ज्यात मानवी प्रचालकांना टेलिऑपरेटर्सची माहिती अशा प्रकारे मिळते की त्यांच्यामध्ये होणारा संवाद ऑपरेटर शारीरिकदृष्ट्या उपस्थित आहे आणि जवळजवळ वास्तविक आहे असे वाटते. व्हीआरमध्ये खरे जग हे आभासी जगासारखे वाटते तर टेलिप्रेझेन्समध्ये आभासी जग हे खरे जग वाटते. परंतु एआरमध्ये खऱ्या जगात वस्तू ऑगमेंट होते. व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिव्हाइसच्या मर्यादेमुळे, चौथा पैलू, पोर्टेबिलिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी एआरमध्ये सादर केलेली पोर्टेबिलिटी ज्याद्वारे वापरकर्ते मोठ्या वातावरणात फिरू शकतात. एआरमध्ये सीन जनरेटर, ट्रॅकिंग आणि डिस्प्ले सारखे 3 मूलभूत घटक आहेत.

शिक्षण क्षेत्रातील ऑगमेंटेड रिऍलिटी: विद्यार्थ्याला संकल्पना समजून घेण्यास मदत होते. शिकवण्याची पारंपारिक पद्धत कंटाळवाणी असू शकते. संकल्पना समजून घेणे, संकल्पनेचे दृश्य मानणे मांडणे, संकल्पना लक्षात ठेवणे इत्यादी स्वरूपात अध्यापन आणि शिक्षण प्रक्रियासुधारण्यासाठी एआर उपयुक्त आहे.

ऑगमेंटेड रिऍलिटी संकल्पनेचे दृश्य करून संकल्पना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इमर्सिव्ह इफेक्ट्स देते. एआर मुळे वर्गाच्या बाहेरील वातावरणापर्यंत औपचारिक अध्यापन वर्गादरम्यान पूल तयार करते. जेणेकरून वर्गाची औपचारिक आवश्यकता पूर्ण होते. विद्यार्थ्यांना व्हिज्युअल इफेक्ट्ससह नवीन गोष्टी शिकण्यासाठी गुंतवून ठेवणे त्यांना संवादात्मक आणि अधिक उत्साही बनवते.

ऑगमेंटेड रिऍलिटी इन टुरिझम: एआर आणि मोबाइल मार्गदर्शक प्रणालीचा वापर सध्या टूर गाईड अनुप्रयोगांमध्ये असलेल्या समस्या टाळण्यासाठी मोबाइल टूर गाईड प्रणाली प्रदान करण्यासाठी केला जातो. जे अधिक संवादात्मक, माहितीपूर्ण आणि युजर फ्रेंडली असेल. प्रतिमा-आधारित एआर वापरून अँड्रॉइड मोबाइलवरील जवळच्या पर्यटन बिंदू स्थानासह गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात कमी अंतर दर्शवून वापरकर्त्याला मार्गदर्शन करीत आहे.

ऑगमेंटेड रिऍलिटी इन मेंटेनन्स: यंत्राची क्लिष्ट यंत्रणा समजून घेण्यासाठी तंत्रज्ञाला एआर चा उपयोग होतो. ज्याचा उपयोग तंत्रज्ञाला प्रशिक्षण देण्यासाठी व प्रशिक्षण खर्चाचा बोझा कमी करण्यासाठी करता येतो.

ऑगमेंटेड रिऍलिटी इन ऍडव्हरटायजिंग: एआर जाहिरात साधने ग्राहकांना प्रकल्प आणि सेवांबद्दल माहिती देण्यासाठी उपयुक्त आहेत जे जाहिरातींची उद्दीष्टे साध्य करतील. तर विशिष्ट बॅनर आणि स्ट्रीमर्सची जाहिरात करण्याच्या पारंपारिक पद्धतीत जे सहसा मजकूर आणि प्रतिमांच्या स्वरूपात असंवादी असतात आणि केवळ लक्ष वेधून घेऊ शकतात. स्मार्टफोनवर उपयुक्त असलेल्या युनिटी ३ डी आणि वुफोरिया सॉफ्टवेअरचा वापर करून विविध जाहिरात अनुप्रयोग विकसित केले जाऊ शकतात. आर च्या मदतीने ग्राहकाला त्याचा घराच्या अंतरंगात कुठला कलर सूट होईल हे कळायला मदत होते. कॅमेरा च्या मदतीने वास्तविक जगाची माफीती घेऊन डिजिटल इन्फॉर्मशन डिजिटली संयोजनाने डिस्प्ले केली जाते.

ऑगमेंटेड रिऍलिटी इन लष्करात: एआर वापरून उंची, एअरस्पीड आणि क्षितिज रेषा आणि इतर डेटाची माहिती डिस्प्ले डिव्हाइसवर लढाऊ वैमानिकाच्या डोळ्यासमोर दाखवली जाते.

पायलटला सामान्यत: दर्शविलेल्या डेटामध्ये इतर गंभीर डेटाव्यतिरिक्त उंची, एअरस्पीड आणि क्षितिज रेषा समाविष्ट होते.

वैद्यकीय क्षेत्रात एआर: वैद्यकीय शिक्षण घेत असणारे विद्यार्थी नियंत्रित वातावरणात एआर च्या माध्यमातून शस्त्रक्रिये ची प्रॅक्टिकस करू शकतात. दृशीकरणाच्या मदतीने क्लीष्ट वैद्यकीय प्रक्रिया रुग्णाला समजावून सांगण्यात मदत होते. चुंबकीय अनुनाद इमेजिंग (MRI) किंवा X-ray आणि एआर एकत्र करून शल्यचिकित्सकाला माहिती डिस्प्ले डिव्हाइस वर उपलब्ध करून मिळते ज्याचा उपयोग शल्यचिकित्सक शास्त्रक्रिये साठी करू शकतो.

वास्तविक शरीरावर आभासी वस्तू अधिरोपित करणे
वास्तविक शरीरावर आभासी वस्तू अधिरोपित करणेCollege

प्राध्यापिका लक्ष्मी ज्ञानेश्वर सपकाळ

मुद्रण विभाग,

पुणे विद्यार्थी गृहा चे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि,

पुणे-४११००९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com