कोल्हापुरात रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात रोजगार मेळावा

कोल्हापुरात रोजगार मेळावा

"मिशन 2025-मेरे देश की धरती" मधून मिळणार शेकडो युवकांच्या हाताला काम.

कोल्हापूर (प्रतिनिधी) राज्यातल्या तरुणाच्या हाताला काम मिळावे या उदेशाने सुरु असलेल्या अनेक जिल्ह्यातील रोजगार मेळावा कोल्हापूर येथेही पार पडला. कोल्हापूर आजपासच्या जिल्ह्यातील अनेक युवकांनी या मेळावात सहभाग नोंदवून आपल्या आयुष्यातील भविष्यातील स्वप्न रंगवले आहेत. त्या मेळाव्याच्या निमित्ताने शेकडो युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. महालँड ग्रुप आयोजित बीपीएफटी कार्पोरेशनच्या माध्यमातून झालेल्या या मेळाव्यास अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी मार्गदर्शन केलं. राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्येही असे रोजगार मिळावे आयोजित केले जाणार ज्यातून अनेक युवकांच्या हाताला काम मिळेल अशी माहिती संयोजक संयोजक अड पंडित राठोड यांनी सांगितले.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे यशस्वी होऊन कोल्हापूर झाली आहे. शेकडो उद्योजक याचा भाग बनले आहेत. या मेळाव्यास कोल्हापुर, सातारा, सांगली, नाशिक, पुणे,रत्नागिरी आणि तळ कोकणातून अनेक गरजू युवा उद्योजक, शासकीय- निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, स्व व्यवसायिक, नोकरदार, गृहिणी, बचत गट, सामाजिक संस्था व सार्वजनिक मंडळ यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

‘जॉईन मिशन करोडपती’ या संकल्पनेत सर्व लोकांचे वार्षिक उत्पन्न किमान करोडो च्या घरात राहिले पाहिजे,त याबाबतच्या नव-नवीन संधी, प्रशिक्षण व मार्गदर्शन या दरम्यान करण्यात आले आहे.

महालँड ग्रुप आयोजित बीपीएफटी कार्पोरेशनच्या माध्यमातून झालेल्या या मेळाव्यात केंद्र सरकार स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, मोतीलाल ओसवाल इन्वेस्टमेंट सर्व्हिसेस, अस्पायर स्किल इंडिया, बोधी सामाजिक संस्था, रत्नधाव फाउंडेशन, मेघाश्रेय संस्था, लॉ मॅग्नेट फोरम, सीएसआर इंडिया, अनेक कार्पोरेट कंपनीज, इ. सक्रिय सहभागी झाल्या होत्या.

"मिशन 2025 मेरे देश की धरती’ अंतर्गत भारताच्या प्रमुख स्मार्ट सिटी नवी मुंबई, नवीन ठाणे, नवीन पुणे मध्ये सर्वांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यवसाय, नोकरी, स्वरोजगार, गुंतवणूक, घर, इ. संधीसाठी या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने गरजूंची उपस्थिती होती.

यादरम्यान प्रमुख उपस्थितीमध्ये अड पंडित राठोड संस्थापक अध्यक्ष महालँड ग्रुप, लॉ मॅग्नेटिकचे सीईओ ऍटर्नी मनीष जाधव, ज्येष्ठ लाइफ कोच सुनील सैतवाल, कनेरी मठाचे सीईओ बारामतीकर, बडा बिजनेसचे प्रतिनिधी विवेक बिंद्रा यांच्या टीम मधून सुदाम पवार, प्रसिद्ध उद्योजिका स्वप्ना कुलकर्णी, बोधी संस्थाचे अध्यक्ष दयानंद सोनसळे, रत्नाधाव फाउंडेशनचे चेतन बंडेवार, युवा उद्योजक अनिल नाईक, कोल्हापूर विभाग प्रमुख प्रमोद आवळे व टीम यांची उपस्थिती होती.

टॅग्स :IndiastudentEmployment