श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे दिवाळी निमित्त फराळांचे पदार्थ वाटप. Food donation by Srimati Kashibai Navale College | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Distribution

श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे दिवाळी निमित्त फराळांचे पदार्थ वाटप.

sakal_logo
By
टीम YIN युवा

पुणे: दिनांक १० ऑक्टोबर २०२१, सिंहगड टेकनिकल एडुकेशन सोसायतीचे, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, कोंढवा बु., पुणे या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत, दिवाळी सणनिमित्त सार्थक सेवा संघ, आंबळे येथील अनाथाश्रमाला भेट देऊन आपली सामाजिक बांधिलकी म्हणून येथील अनाथ मुलांना विविध फराळाचे खाद्य पदार्थ, अभ्यासासाठी वह्या-पुस्तके तसेच आवश्यक किराणा साहित्य देऊन त्यांची दीपावली गोड करण्याचा प्रयत्न केला.

तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी येथील मुलांसोबत मनसोक्त गप्पागोष्टी केल्या, त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या, त्यांच्यासोबत विविध खेळांमध्ये सहभाग घेतला आणि दुपारी त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. रमेश गाडेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना, सर्व अनाथ मुलांना आपुलकीने जवळ घेऊन त्यांनी चांगला अभ्यास करावा, विविध खेळांमध्ये नैपुण्य प्राप्त करावे, मनामध्ये कोणत्याही प्रकारचा नेऊनगण्ड न ठेवता अथक परिश्रम करून आपले व आपल्या सार्थक या संस्थेचे नाव मोठे करावे, असा आशावाद व्यक्त केला. तसेच या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल कुडीया यांचे या सामाजिक कार्याबद्दल मनापासून आभार मानले.

तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक दयानंद काकड, अविनाश गलधर, सेजल भंडारे, दीप्ती थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

इतर स्वयंसेवक वैष्णवी कांबळे,सत्यनारायण ठाकूर,पौर्णिमा हंगारगे, वैभव कुंटे, सिद्धार्थ डुंबरे ,प्रणय घीसरे,अमरदिप जाधवर यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे शेवटी प्रा. रमेश गाडेकर यांनी सर्वांचा निरोप घेताना भावविवश होत आम्ही प्रत्येकवर्षी सार्थक सेवा संघ, या आश्रमाला भेट देऊ आणि आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून शक्य तेवढी मदत करू अशी ग्वाही दिली.

सदर कार्यक्रमाचे नियोजन रासेयो अधिकारी प्रा.रमेश गाडेकर यांनी प्राचार्य डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

loading image
go to top