निलया एज्युकेशनमध्ये इंद्रनील चितळे यांचे उद्योजकतेवरील प्रेरणादायी सत्र

निलया एज्युकेशनमध्ये इंद्रनील चितळे यांच्या मार्गदर्शनपर सत्रादरम्यान उपस्थित मान्यवर व विद्यार्थी
निलया एज्युकेशनमध्ये इंद्रनील चितळे यांच्या मार्गदर्शनपर सत्रादरम्यान उपस्थित मान्यवर व विद्यार्थी
Updated on

पुणे, ३ मार्च : “निलया एज्युकेशन” च्या वतीने चितळे ग्रुपचे मॅनेजिंग पार्टनर श्री. इंद्रनील चितळे यांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले. निलया एज्युकेशन कॅम्पस मध्ये भरवलेल्या या कार्यक्रमात उद्योजकतेची मूलभूत तत्त्वे, नेतृत्वगुण, आणि व्यवसाय वृद्धी यावर सखोल चर्चा झाली.

श्री. चितळे यांनी व्यवसायाच्या विस्तारातील प्रवास, आव्हाने, आणि त्या मार्गातील जिद्द व मेहनत याबाबत विद्यार्थ्यांसोबत अनुभव शेअर केले. तसेच, तंत्रज्ञान, AI, आणि ऑटोमेशन यांचा व्यवसायातील महत्त्वपूर्ण वाटा कसा आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. बदलत्या काळात व्यवसाय टिकवण्यासाठी नवीन कल्पनांना स्वीकारणे आणि स्मार्ट वर्क करणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सत्रातील प्रश्नोत्तरांचा उत्स्फूर्त भाग विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय भोजने आणि अर्णव मेहता यांनी उत्तम प्रकारे पार पाडला. अस्मिता चव्हाण आणि अथर्व कुडे यांनी अत्यंत सत्राचे उत्कृष्ट सुत्रसंचलन केले.

कार्यक्रमाला निलया एज्युकेशनचे संस्थापक सीए निलय मेहता, पायल मेहता, गौरी कुलकर्णी- नाईक आणि ममता शहा यांची उपस्थिती लाभली. त्यांनी श्री. चितळे यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

निलया एज्युकेशन चे श्री निलय मेहता यांनी श्री. इंद्रनील चितळे यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना नक्कीच मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com