
पसायदान फाउंडेशन तर्फे प्रत्येक रविवारी एम. पी. एस. सी च्या मुलांना जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली.
पुण्यात एम. पी. एस. सी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुला मुलींच्या मार्गात वाढत असलेल्या अडचणी... सतत परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेलं नैराश्य आणि आत्महत्या..
या एकंदरीत परिस्थितीत मुलांना एक भक्कम मदत उभी करण्यासाठी पसायदान फाउंडेशन पुढे आले आहे. रविवार च्या दिवशी पुण्यातील खानावळी बंद असतात आणि परिणामी सर्व मुला मुलींना उपाशीपोटी राहावं लागतं..आणि ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांना प्रत्येक रविवारी जेवणाची सोय उपलब्ध करून दिल्याचे पसायदान फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष युवाकीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रभरातील नवतरुणांच्या पसंतीचे असलेले एक कीर्तनकार समोर येऊन विद्यार्थ्यांसाठी करत असलेले अशा पध्दतीचे काम , आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे , तसेच आम्ही आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो , अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या !!
Web Title: Pasaydan Foundation Provides Meals To The Mpsc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..