esakal | विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमध्ये भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमध्ये भरारी

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमध्ये भरारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अनिकेत मोरे

इंदापूर : इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये भरीव कामगिरी करून करियरमध्ये भरारी घेतली आहे. या प्लेसमेंटमधून समाधान गार्डे याची कॅपजेमिनी - पुणे येथे, शुभम खोचरे याची मूनराफ्ट इनोव्हेशन, बंगलोर येथे,शांभवी पाटील हिची सामा टेक्नॉलॉजीज, पुणे येथे आणि खुशाल फुगे याची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पुणे येथे निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.साहूजी म्हणाले की, सध्याच्या या कोरोना आपत्तीच्या काळामध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणे दुर्मिळ झाले आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील या विद्यार्थ्यांनी जिद्दीने अथक परिश्रमांच्या जोरावर हे यश मिळवले असल्याने त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे व्यक्तिमत्व विकास होत असल्याचे सांगितले. तसेच ॲप्टिट्यूड ट्रेनिंगसारख्या प्रशिक्षणांमुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसारख्या आव्हानांना सामोरे जाता येते. महाविद्यालयामध्ये प्रात्यक्षिकांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाणारा वेळ तसेच प्रोजेक्टर सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चालणारे अध्यापन , यामुळे विद्यार्थी प्रात्यक्षिक कौशल्यांमध्ये तरबेज होत असल्याचे सांगितले.

हेही वाचा: मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी, पगार 1.60 लाख रुपये

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाचे आणि उद्योजकता विकासाचे शिक्षण घेता यावे म्हणून महाविद्यालयामध्ये या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी. व बी.कॉम हे दोन नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू होत असल्याचे जाहीर केले. यावेळी बीसीए विभागप्रमुख प्रा. निलेश काळदाते, बीसीएस विभागप्रमुख प्रा. सर्फराज शेख, बीबीए विभागप्रमुख सतीश भोंग , ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. तमन्ना शेख, शैक्षणिक संशोधन अधिकारी प्रा. ज्योती टेके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आदेश बनकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन आवटे, महाविद्यालयीन यिन अध्यक्ष गणेश घाडगे हे उपस्थित होते.

loading image