esakal | झूम : क्लास भी, सुरक्षा भी!
sakal

बोलून बातमी शोधा

Cars

झूम : क्लास भी, सुरक्षा भी!

sakal_logo
By
प्रणीत पवार

भारतात पूर्वी वाहनांच्या निर्मितीचा दर्जा आणि सुरक्षात्मक बाबींकडे जास्त लक्ष दिले जात नव्हते. अपघात वाढून मृतांच्या संख्येतही वाढ होऊ लागल्यानंतर कारमधील सुरक्षात्मक बाबींची गरज हळूहळू लक्षात येऊ लागली. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जागरूकता आणि सुरक्षेचे महत्त्वही वाढीस लागले. या कारणांमुळे कार कंपन्या सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम असलेल्या कार बनवू लागल्या. जागरुकता वाढल्याने आताची आधुनिक पिढी कार कंपन्यांच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या इतर ऑफरपेक्षा सुरक्षात्मक फीचर्स किती, याकडे कटाक्षाने लक्ष देते. याच पार्श्वभूमीवर भारतातील सध्या किमतीने परवडणाऱ्या आणि सुरक्षेचे सर्वाधिक रेटिंग असणाऱ्या कारचा आढावा आपण घेणार आहोत.

Mahindra XUV 300

किंमत : ७.९५ लाखांपासून पुढे

रेटिंग : ५ स्टार (प्रौढ), ४ स्टार (लहान मुले)

ही भारतातील ‘एनसीएपी’चे सर्वाधिक रेटिंग मिळालेली सुरक्षित कार ठरली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील या कारमध्ये दोन एअर बॅग, चारही चाकांना डिस्क ब्रेक, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, ईबीडी-एबीएस, चाईल्ड सिट अँकर्स यांसारखे अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमधील व्हेरिएंटनुसार यामध्ये बदल करण्यात आले आहेत.

Tata Altroz

किंमत : ५.४४ लाखांपासून पुढे

रेटिंग : ५ स्टार (प्रौढ), ३ स्टार (लहान मुले)

प्रीमिअम हॅचबॅक श्रेणीतील टाटाची अल्ट्रोज ही देखील सुरक्षेच्या दृष्टीने लोकप्रिय कार ठरली आहे. ही कार मजबूत अशा ALFA आर्किटेक्चरवर या कारची निर्मिती करण्यात आली आहे. एक्सयुव्ही ३०० प्रमाणेच अल्ट्रोजमध्येही विविध व्हेरिएंटनुसार ड्युअल एअर बॅग, ईबीडी-एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल आदी सुरक्षात्मक फीचर्स दिले आहेत.

Maruti Suzuki S-Cross

किंमत : ८.३९ लाखांपासून पुढे

रेटिंग : ५ स्टार (प्रौढ),

४ स्टार (लहान मुले)

मारुती सुझुकीची एस-क्रॉस ही ‘एशियन एनसीएपी’च्या (एएसईएन) क्रॅश टेस्टमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळालेली कार असून, सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत निर्मिती दर्जा असलेली कार म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. या कारची निर्मिती सुझुकीच्या टोटल इफेक्टिव्ह कंट्रोल टेक्नॉलॉजी (टीईसीटी) या तंत्रज्ञानावर आधारित आहे. व्हेरिएंटनुसार एस क्रॉसमध्ये ड्युअल एअर बॅग, ईबीडी-एबीएस आदी फीचर्स दिले आहेत.

Volkswagen Polo

किंमत : ५.८७ लाखांपासून पुढे

रेटिंग : ४ स्टार (प्रौढ),

३ स्टार (लहान मुले)

मूळची जर्मनीची असलेली व्होक्सवॅगन कंपनी आपल्या कारमध्ये सुरक्षेच्या बाबतीत गुणवत्ताही कायम ठेवते. पोलो कारही सुरक्षेच्या बाबतीत तितकीच प्रभावी आहे. या कारची बॉडी मजबूत अशा जस्ताच्या धातूपासून (गॅल्व्हनाईझ स्टिल) बनवण्यात आली आहे. या कारमध्येही ड्युअल एअर बॅग, एबीएस कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे.

*किंमत एक्स शोरूम

loading image