
आगामी काळात इलेक्ट्रिक कारला भारतात वाढती मागणी पाहता इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी ‘टेस्ला’नेही भारतात एन्ट्री केली. महागड्या वाहनांसाठी ही कंपनी ओळखली जाते. सध्या बाजारात टाटा, एमजी, ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार धावताना दिसतात. टेस्लाच्या एन्ट्रीमुळे भविष्यात इलेक्ट्रिक कारची बाजारात स्पर्धा वाढणार आहे.
आगामी काळात इलेक्ट्रिक कारला भारतात वाढती मागणी पाहता इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी ‘टेस्ला’नेही भारतात एन्ट्री केली. महागड्या वाहनांसाठी ही कंपनी ओळखली जाते. सध्या बाजारात टाटा, एमजी, ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार धावताना दिसतात. टेस्लाच्या एन्ट्रीमुळे भविष्यात इलेक्ट्रिक कारची बाजारात स्पर्धा वाढणार आहे.
लॉकडाउनपूर्वी वाहन क्षेत्रात मंदी होती; मात्र लॉकडाउननंतर कारची मोठी प्रमाणात विक्री झाल्याचे डिसेंबरच्या आकडेवारीवरून समजते. यात इलेक्ट्रिक वाहनांना सुद्धा भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगभरातील ऑटो कंपन्या भारतात आपल्या कार लाँच करण्याच्या तयारीत असून, ‘टेस्ला’नेही उद्योग विस्तारण्यासाठी पावले उचलली आहेत. ही प्रसिद्ध उद्योगपती ऐलन मस्क यांची कंपनी आहे. जबरदस्त डिझाइन आणि आधुनिक आणि स्वयंचलित फीचर्ससाठी कंपनी ओळखली जाते. टेस्लाने २००८ मध्ये ‘रोडस्टार’ हे पहिले कार मॉडेल बाजारात आणले व अवघ्या दशकभरात कार बाजारामध्ये दबदबा निर्माण केला. ‘टेस्ला मॉडेल - ३’ आणि ‘टेस्ला वाय’ या कारची परदेशात सर्वाधिक विक्री होते. भारतामध्ये टेस्लाचे सेदान प्रकारातील ‘टेस्ला मॉडेल-३’ मार्चमध्ये दाखल होईल.कंपनीने या कारसाठी केवळ ऑनलाइन बुकिंगचाच पर्याय ठेवला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
‘टेस्ला मॉडेल-३’ची भारतातील अंदाजित किंमत
अमेरिकेत ‘मॉडेल-३’ची किंमत भारतीय चलनानुसार सुमारे २७.८७ लाख ते ४०.३४ लाख रुपये आहे. भारतात ही कार सुरुवातीला आयात करूनच विक्री केली जाणार असल्याने तिची किंमत सुमारे ६० लाखांच्या (एक्स-शोरूम) आसपास असू शकते.
‘टेस्ला मॉडेल-३’चे स्पेसिफिकेशन
टेस्ला कंपनी कार आणि त्यातील फीचर्स नेहमीच अपडेटेड ठेवण्याचा प्रयत्न करते. टेस्लाच्या सर्व कारमध्ये डॅशबोर्डवर मध्यभागी मोठा डिस्प्ले असतो. टेस्ला मॉडेल-३ मध्ये १६ इंचाेचा टचस्क्रीन देण्यात आला असून, त्याच कनेक्टेड सर्व्हिस असणार आहेत. ‘मॉडेल-३’मध्ये पॅनारोमिक ग्लास रूफ, पॉवर ॲडजस्टेबल आणि उंचीनुसार पुढचा सीट असणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘टेस्ला-३’ तीन प्रकारांत
‘टेस्ला मॉडेल -३’मध्ये स्टँडर्ड रेंज प्लस, लाँग रेंज आणि परफॉर्मन्स असे तीन मॉडेल आहेत. भारतात यापैकी स्टँडर्ड आणि लाँग रेंज हेच मॉडेल येण्याची शक्यता आहे.
स्टँडर्ड रेंज प्लस
टेस्लाचे हे बेसिक मॉडेल.
सिंगल चार्जमध्ये ४५० किलोमीटरपर्यंत धावू शकते.
० ते १०० किलोमीटर प्रतितासाचा वेग ५.६ सेकंदात घेते.
लाँग रेंज
या मॉडेलमध्ये मोठी बँटरी आणि दोन मोटार
सिंगल चार्जमध्ये ५६० किलोमीटर धावू शकते.
० ते १०० किलोमीटर प्रतितासाचा वेग ४.२ सेकंदात घेते.
परफाॅर्मन्स
टॉप मॉडेल
सिंगल चार्जमध्ये ५०० किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते.
० से १०० किलोमीटर प्रतितास वेग ३.१ सेकंदात घेते.
Edited By - Prashant Patil