मोबाईल हरवलाय? असा शोधा!

ऋषिराज तायडे
बुधवार, 15 जानेवारी 2020

‘सीईआयआर’च्या संकेतस्थळावर जाऊन तुमचा मोबाईलचा ‘आयएमईआय’ नंबर नोंदवून तो ब्लॉक करता येईल.

1. मोबाईल हरवल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा. मोबाईल ऑपरेटरला मोबाईल हरवल्याचे सांगून नव्या सीमकार्डची मागणी नोंदवा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2. ‘सीईआयआर’च्या संकेतस्थळावर जाऊन तुमचा मोबाईलचा ‘आयएमईआय’ नंबर नोंदवून तो ब्लॉक करता येईल.

3. मोबाईल क्रमांक, मोबाईल कंपनी, खरेदीची पावती, हरवलेले ठिकाण, तारीख, नाव, पत्ता, ओळखपत्र, पोलिस तक्रारीची प्रत आदी माहिती अपलोड करा.

4. तुम्हाला आलेला ओटीपी क्रमांक टाकून अर्ज पूर्ण करा. तुम्हाला रिक्वेस्ट आयडी मिळेल, त्याद्वारे मोबाईल ट्रॅकची प्रक्रिया पाहता येईल.

5. मोबाईल सापडल्यावर तो वापरण्यासाठी ‘आयएमईआय’ अनब्लॉक करा. त्यासाठी पुन्हा एकदा ‘सीईआयआर’च्या संकेतस्थळावरून ‘अनब्लॉक फाऊंड मोबाईल’ पर्याय निवडा.

6. तुम्ही रिक्वेस्ट आयडीच्या मदतीने ‘अनब्लॉक आयएमईआय’चे स्टेटस कळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rushikesh tayade article Mobile Search with CEIR