esakal | टेक्नोहंट : कॉन्टॅक्टलेस ‘आरपीएम’द्वारे रुग्णांची काळजी

बोलून बातमी शोधा

PM System
टेक्नोहंट : कॉन्टॅक्टलेस ‘आरपीएम’द्वारे रुग्णांची काळजी
sakal_logo
By
ऋषिराज तायडे

कोरोनामुळे सध्या देशात दररोज लक्षावधी कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येपुढे डॉक्टर, नर्सेसची संख्या अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर कॉन्टॅक्टलेस रिमोट पेशंट मॉनिटरिंग (आरपीएम) यंत्रणेद्वारे कोणत्याही मानवी संपर्काविना एकाच वेळी शेकडो रुग्णांवर लक्ष ठेवणे आता शक्य झाले आहे.

कोरोना संकटात आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने लक्षात घेता मराठमोळ्या मुदित दंडवते या तरुणाने खास ‘कॉन्टॅक्टलेस रिमोट पेशंट मॉनिटरिंग’ (आरपीएम) यंत्रणा विकसित केली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या उद्देशाने मुदित यांनी २०१५मध्ये डोझी या स्टार्टअपची स्थापना केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विकसित केलेली आरपीएम यंत्रणा रुग्णालयातील किंवा गृहविलगीकरणातील रुग्णाच्या खाटेला जो़डली जाते. या यंत्रणेच्या वैद्यकीय मापदंड दरतासाला १०० पेक्षाही अधिक वेळा तपासले जातात. त्यासाठी रुग्णाच्या संपर्कात येण्याची गरजही पडत नाही. उत्तम दर्जाचा संपर्करहित सेंसर, कम्युनिकेशन पॉड आणि क्लाऊडबेस्ड मॉनिटरिंग सिस्टिम बसवली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची जोड दिल्याने रुग्णाची माहिती जाणून घेता येते.

आरपीएम काय करते?

 • हृदयाचे ठोके

 • श्वसनदर,

 • झोपेचे प्रमाण

 • झोपण्या-उठण्याची वेळ

 • झोपेत घोरण्याचे प्रमाण

 • अशक्तपणा

 • तणावाची पातळी

आरपीएमची वैशिष्ट्ये

 • सेन्सर : व्हायब्रो एकॉस्टिक ट्रान्सड्युसर

 • आकार -

 • सेन्सर : 680 मिमी बाय 120 मिमी

 • पॉड : 65 मिमी बाय 50 मिमी

 • पॉवर केबल : 1.5 मीटर

 • डेटा साठवणूक क्षमता : 150 तास

 • कम्युनिकेशन : वायफाय, बीएलई

 • मोबाईल अॅप : अॅण्ड्रॉईड व आयओएस

नागपूरला 250 खाटांना जोडणी

‘डोझी’ कंपनीने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयो रुग्णालयात एकूण २५० खाटांना आरपीएम यंत्रणा जोडली आहे. त्यासाठी रुग्णालयात एका नियंत्रण कक्षाचीही निर्मिती केली असून त्याद्वारे रुग्णांवर २४ तास देखरेख ठेवली जाते. त्याशिवाय ‘डोझी’ने भारतातील १५०हूनही अधिक रुग्णालयांतील तब्बल चार हजार खाटांना ही यंत्रणा जोडली आहे.