लग्नाची गोष्ट : आमचा ‘डार्लिंग’ संसार...

समीर आशा पाटील, अश्विनी पाटील
Thursday, 28 January 2021

‘यंटम’, ‘चौर्य’, ‘वाघेऱ्या’ यांसारखे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आपल्यासाठी घेऊन येणारे दिग्दर्शक समीर आशा पाटील लवकरच त्यांच्या आगामी ‘डार्लिंग’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपल्या भेटीला येत आहेत. त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील या शिक्षिका आहेत. त्यांच अरेंज मॅरेज.

‘यंटम’, ‘चौर्य’, ‘वाघेऱ्या’ यांसारखे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आपल्यासाठी घेऊन येणारे दिग्दर्शक समीर आशा पाटील लवकरच त्यांच्या आगामी ‘डार्लिंग’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपल्या भेटीला येत आहेत. त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील या शिक्षिका आहेत. त्यांच अरेंज मॅरेज.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्नी अश्विनीबद्दल बोलताना समीर म्हणाला, ‘‘माझ्या आई-वडिलांचं निधन खूप लवकर झालं. त्यानंतर अश्विनी माझ्याशी लग्न करून या घरात आल्यावर तिनं सगळं खूप छान सांभाळून घेतलं. तिच्या येण्यानं या घराला घरपण मिळालं. कोणत्याही घरात एका स्त्रीच्या असण्यानं ते घर पूर्ण असतं. ते आमचं घर अश्विनीनं पूर्ण केलंय. ती खूप सपोर्टिव्ह आहे. आतापर्यंत मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तिनं माझी साथ दिली आहे. सर्वांशी प्रेमानं, मिळून मिसळून ती वागते. आम्हाला एक मुलगा आहे. त्याचं नाव कबीर. त्याचं संगोपन ती अतिशय उत्तम प्रकारे करते. ती शिक्षिका असल्यामुळं खूप हजरजबाबी आहे आणि तिच्यातला तो गुण मला फार आवडतो आणि तो मला आत्मसात करायला नक्कीच आवडेल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अश्विनीसारखी बायको मला मिळाली.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अश्विनी समीरविषयी बोलताना म्हणाली, ‘‘समीर हा कुठल्याही गोष्टीकडं सकारात्मक दृष्टीनं बघणारा माणूस आहे. तो सगळ्यांना सामावून घेतो. यासोबतच कोणत्याही सिच्युएशनवर पॅनिक न होता शांतपणे विचार करून रिअॅक्ट करणं त्याला खूप चांगलं‌ जमतं. तो कोणतीही गोष्ट कधीच फार वेळ मनात ठेवत नाही. एखाद्या गोष्टीचा फार काळ विचार न करता ती गोष्ट विसरून पुढे जायचं हा त्याच्यातला गुण मला अतिशय भावतो. तो नेहमीच खूप गोड बोलतो आणि त्याच्या अशा प्रेमळ आणि गोड बोलण्यानं त्याला समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करणं हे खूप छान येतं. समीर चांगला नवरा आहे व त्याचबरोबर चांगला पिता आणि तितकाच चांगला दिग्दर्शकही आहे. मी त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर त्याला भेटायला जाते; दिग्दर्शकाच्या भूमिकेत त्याला बघते. मला त्यानं आतापर्यंत दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट खूप आवडले आहेत. आगामी ‘डार्लिंग’ मला आवडला आहे. या सगळ्या गोष्टींमुळं मला समीरचा अभिमान आहे.’’

‘डार्लिंग’ या अगामी चित्रपटाविषयी समीरनं सांगितलं, ‘‘गेलं एक वर्ष आपण घरी आहोत; आपण सर्वांत जास्त वेळ आपल्या कुटुंबीयांबरोबर घालवला आहे. या काळात आपल्या सगळ्यांना कौटुंबिक नात्यांमधली गंमत कळली आहे. आपलं कुटुंबाचं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान असतं हे आपण अनुभवलं आहे. हा चित्रपट यावरच भाष्य करतो. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल आणि प्रेक्षकांप्रमाणंच मी स्वतःही खूप उत्सुक आहे या चित्रपटासाठी...’’

(शब्दांकन : राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samir Patil Writes about Darling Movie Entertainment