यिनच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधनात्मक फलक झळकावून मतदान जागृती.

मतदान जनजागृती करताना यिनचे विद्यार्थी.
मतदान जनजागृती करताना यिनचे विद्यार्थी.

पुणे, ता. १३ - पुणे शहर 'यिन' विद्यार्थ्यांचा वतीने फर्ग्युसन रोड वरील गुडलक चौकात मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरु असून सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे आहे असा संदेश या वेळी देण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात असून, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यालाच अनुसरून यिनच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीचे फलक झळकावत नागरिकांचे लक्ष वेधले व मतदान करण्याचे आवाहन केले. या वेळी मानवी साखळी करून मतदारांना मतदानासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे आयोजन यिन पुणे शहर च्या वतीने करण्यात आले होते. या मध्ये यिन मंत्रिमंडळातील सभापती ओमकार डोंबे, यिन शिक्षण मंत्री धैर्यशील राजेभोसले, यिन जिल्हा सभागृह सभापती मुक्तिराम नाईक, यिन सदस्य ओम आव्हाळे, नचिकेत बोराडे, सोपान कदम, विठ्ठल चौरे, प्रज्वलीदीप वाघमारे, मारोती इबितवार, मंगेश साबळे, वेद अटला आदी विद्यार्थी उपस्थित होते.

विविध फलक ठरले लक्षवेधी...

यिनच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा टक्का वाढावा व जागृती व्हावी यासाठी विविध आशयाचे फलक तयार करून गुडलक चौकात झळकावले. 'आपले अमूल्य मतदान लोकशाही मजबूत करेल !' , 'चॅटिंग सोडा आणि वोटिंग करा' , 'माझे मत माझा अधिकार' , 'राहूद्या थोडे लोकशाहीचे भान, मतदान हेच सर्व श्रेष्ठ दान' , या फलकांनी उपस्थित नागरिकांचे व विशेष लक्ष वेधून घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com