esakal | पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जी. के. पाटे (वाणी) इन्स्टिट्युट अँड मॅनेजमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा. Entrepreneurship Development Workshop for Students by PVG’s College of Engineering and Technology in association with G. K. Pate (Vani) Institute and Management, Pune.
sakal

बोलून बातमी शोधा

B-plan

पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जी. के. पाटे (वाणी) इन्स्टिट्युट अँड मॅनेजमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा.

sakal_logo
By
टीम YIN युवा

पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जी. के. पाटे वाणी इन्स्टिट्युट अँड मॅनेजमेंट, पुणे व्यवस्थापन संस्थेच्या, उद्योजक विकास कक्षाच्या अंतर्गत सुमारे १० दिवस 'B - PLAN' हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे स्वरूप हे विद्यार्थ्यांसाठी ३ व्याख्याने व कार्यशाळा असे होते. आयोजित कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. आयोजित कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता कि विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध व यशस्वी उद्योगजकांसोबत संवाद साधायला मिळावा व मार्गदर्शन घडावे, विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा मिळावी. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना सोबतच व्यावहारिक ज्ञान असणे हे सध्याच्या काळात आवश्यक आहे, याच अनुशंघाने पुणे विद्यार्थी गृहाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले हे सत्र अतिशय उपयुक्त व महत्वाचे ठरले.

सदर कार्यक्रमासाठी श्री. तमनजीत बिंद्रा (co-founder Kaagaz Scanner) श्री. रिषीराज कालीता आणि श्री. रजत डांगी (co-founder Hapramp) हे मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन व्यवसाय कसा सुरु करावा, व्यवसायाचे प्राथमिक स्वरूप कसे असावे, आर्थिक नियोजन कसे करावे तसेच यशस्वी उद्योजक कसा असावा, उद्योजकामध्ये काय गुण असणे आवश्यक आहेत अश्याच अनेक महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले व चर्चा केली.

कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवसायाच्या संकल्पना उपस्थित मान्यवरांसमोर मांडल्या, श्री तमनजीत बिंद्रा , श्री प्रसाद मुळे आणि डॉ. प्रो.प्रसन्न शेटे यांनी कार्यशाळेचे परीक्षण केले. विजेत्याला रोख रक्कम रु. ४००० बक्षीस स्वरूपात देण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन उद्योजक विकास कक्षाचे सदस्य आलरीच सलदाना , शार्विन फरांदे, अजिंक्य यंगाड, सिद्धार्थ , शाम्भवी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे चेअरमन व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्री. सुनील रेडेकर आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रा. आर. जी कडूसकर, प्राचार्य डॉ. मनोज र. तारांबळे, प्राध्यापिका सौ. विनया देशमुख आणि इतर विभागांचे समन्वयक यांचे सहकार्य लाभले.

loading image
go to top