
पुणे: भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळ माध्यम समूहाच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क" (यिन) तर्फे आयोजित नेतृत्व विकास कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नेतृत्व कौशल्य, सामाजिक बांधिलकी, आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेतले.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “तरुणाईकडे देशाचा विकास घडवण्याची क्षमता आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळते आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य फुलते.”
यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. अविनाश पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले, “नेतृत्व हे केवळ जबाबदारी नसून समाजासाठी प्रेरणा निर्माण करण्याचे माध्यम आहे. यिनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक भान आणि दृष्टी मिळते.” या कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. कल्याणी चौधरी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. महारुद्र कापसे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करताना सांगितले, “विद्यार्थ्यांच्या या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला आहे. नेतृत्व विकास आणि समाजसेवा यासाठी यिन महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.”
यावेळी यिन च्या महाविद्यालयीन अध्यक्षपदी अनामिका शर्मा, उपाध्यक्षपदी गायत्री शिंदे, सचिवपदी ईश्वरी खवले आणि संघटकपदी प्रीती वांझडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित सर्वांनी समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखण्याचा निर्धार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.