esakal | गोरखगड : पर्यटकांची तहान भागवण्यासाठी आखलेल्या मोहिमेची गोष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

गोरखगड : पर्यटकांची तहान भागवण्यासाठी आखलेल्या मोहिमेची गोष्ट

गोरखगड : पर्यटकांची तहान भागवण्यासाठी आखलेल्या मोहिमेची गोष्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-- वेदांत व्यापारी

गोरखगडाची उंची समुद्र सपाटीपासून २१३७ फुट आहे. गोरखगडाच्या आजुबाजुचा परिसर येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे प्रसिध्द आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाच्या साधनेचं ठिकाण असल्यामुळे याचे नाव गोरखगड असे पडले आहे. येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही, पण १६५७ साली मराठयांच्या ताब्यात आलेल्या ह्या गडाचा मोगलांनी २० ऑक्टोबर १६९३ रोजी ताबा घेतल्याचा उल्लेख आढळतो. गोरखगडाचा विस्तार मर्यादित आहे. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर होता.

मर्यादित विस्तार असुनही मुबलक पाण्याची उपलब्धता व निवाऱ्याची सोय गडावर आहे. गेली कित्येक वर्षे किल्ले गोरखगड, पदरगड, सिद्धगड, भैरवगड या ऐतिहासिक वारसा असलेल्या स्मारकावर मुरबाड मधील दुर्गसेवकांच्या माध्यमातून दुर्गसवर्धनाची अनेक कार्य चालू असतात. किल्ले गोरखगड वर खूप पर्यटक येतात. पर्यटकांना पिण्याच्या पाणीसाठा हा मुबलक वा यासाठी विशेषतः दरवर्षी प्रमाणे पाण्याचा टाक्या ह्या साफसफाई करत असतो, जेणे करून त्या पाण्याच्या टाक्या साफसफाई करून पुन्हा त्यात पाणी साठवण होईल. मग आम्ही त्यावर सर्वाशी चर्चा करून रविवारी सुट्टी असल्याने तो मोहिमेचा दिवस ठरवला...

हेही वाचा: बंदी असतानाही कात्रजवळ बैलगाडा शर्यत, 12 जणांविरुद्ध गुन्हा

या मोहिमेची जबाबदारी ही संकेत कदम आणि कल्पेश पवार यांनी स्वीकारली. ठरल्या प्रमाणे सर्वांनी किल्ल्याच्या पायथ्याशी सकाळी ९ : ०० वाजता भेटायचे ठरवले पाण्याचं टाक साफ करण्यासाठी लागणारी साहित्य घेऊन आम्ही सर्व जण किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो साधारण एक-दीड तासाभरात आम्ही किल्ल्यावर पोहोचलो व तेथे गेल्यावर आमचे मार्गदर्शक प्रताप गोडाबे आणि अध्यक्ष अजिंक्य हरड यांनी काम कसे करायचे याचे नियोजन सर्वांना सांगून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नावाचा जयघोष करून कामास सुरवात केली. पहिल्या मोहीम मध्ये राहिलेलं काम हे ह्यावेळी पूर्णत्वास न्यायचे होते सर्वजण जोमाने काम करत होते दोन- तीन तास काम केल्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन जेवण करून घेतलं त्यांनतर सर्वजण पुन्हा पाण्याच्या टाकीत उतरून कामास सुरवात केली... अखेर त्या कामास यश आले सर्वजण खूप आनंदात होते. पावसाळ्यात पर्यटकांची तहान भागवत असलेल्या गोरखगडाच्या पाण्याच्या टाक्यांना आता संवर्धनाची गरज होती. हीच गरज लक्षात घेऊन मुरबाड मधील दुर्गसेवकांनी कुदळ, फावडे, घमले, बादलीच्या साह्याने गाळ काढून पाण्याची टाक साफ केलं... या मोहिमेत २० जणांनी सहभाग नोंदविला होता. ही मोहीम दि. २६ जून २०२१ व १० जुलै २०२१ अश्या दोन्न टप्प्यात पार पडली.

loading image