भारतातून १ लाख ८० हजार टन द्राक्षे निर्यात

ज्ञानेश उगले
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नाशिक - अस्मानी संकटांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यात ३२ हजार मेट्रिक टनांनी घटण्याचा अंदाज आहे. तरीही सरासरीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत युरोपीय देशांमध्ये ९० हजार ५००, तर इतर देशांत ९० हजार मेट्रिक टन अशी एकूण १ लाख ८० हजार ५०० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

ही निर्यात मागील वर्षांच्या तुलनेत कमी असली, तरी २ लाख टनांपर्यंत यंदाची निर्यात जाणार आहे. द्राक्ष निर्यातीबाबत द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी सांगितले. 

तरीही गेल्या वर्षी भारतातून २ लाख ३२ टन द्राक्षांंची निर्यात झाली होती. तथापि भाव कमी मिळाल्याने निर्यातदारांना आर्थिक फटका बसला. या वर्षी मात्र चिलीलाही नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदा चिलीची द्राक्षे युरोपीय तसेच युरोपियेतर देशांमध्ये पोचली नसल्याने भारतीय द्राक्षांना अजूनही मागणी आहे. त्यामुळे या वर्षी भारतीय द्राक्षांना जास्त मागणी असूनही नैसर्गिक संकटांमुळे उत्पादन घटल्याने देशाचे नुकसान झाले आहे, असे खापरे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी उशिरापर्यंत रेंगाळलेला पाऊस, ओखी चक्रीवादळाचा वातावरणावर झालेला परिणाम, ऑक्टोबर छाटणीदरम्यानचा पाऊस यांसारख्या नैसर्गिक संकटांवर मात करीत द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष शेती फुलवली. तरीही नैसर्गिक प्रतिकूलतेचा द्राक्ष उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे सरासरी ३५ लाख टन द्राक्षांचे होणारे उत्पादन या वर्षी ४० ते ४५ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी २० ते २२ लाख टन उत्पादन झाले. त्यात उत्पादकांनी गुणवत्ता टिकवून द्राक्ष उत्पादन घेतल्याने मोठी निर्यात झाल्याचे खापरे यांनी नमूद केले.

बांगलादेशातील निर्यातीवर परिणाम
बांगलादेशात द्राक्ष निर्यात करताना पांढरी द्राक्षे ५५ तर काळी द्राक्ष ७५ रु. प्रतिकिलो एक्साईज ड्यूटी भरावी लागत आहे. त्यामुळे २५ हजार टन निर्यातीवर परिणाम झाला आहे. आज बांगलादेशात ३० ते ३५ हजार टन निर्यात झाली आहे. त्यामुळे भारत सरकारने बांगलादेशाशी विचार विनिमय करून ही ड्यूटी कमी केल्यास तेथे भारतीय द्राक्षांची बाजारपेठ वाढू शकेल, असा विश्‍वास निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.

वातावरणाचा फटका
मागील वर्षी एका एकरात १५०  ते १८० क्विंटल उत्पादन घेतले गेले. त्याच शेतात चालू वर्षी वातावरणातील बदल, छाटणीच्या वेळचा पाऊस आदी नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात घट  होऊन ते ७५ ते १०० क्विंटल निघाले. स्थानिक बाजाराप्रमाणे २ ते ३ लाख  रुपये तर निर्यातीचा विचार करता ३ ते ५ लाख रुपये इतके द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाल्याचे द्राक्ष उत्पादकानी सांगितले.

Web Title: 1 lakh 80 thousand tonnes of grapes export from India