सव्वाशे कोटींचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी पडणार

ज्ञानेश उगले
शुक्रवार, 30 जून 2017

‘जीएसटी’मुळे वाढणार कीडनाशकांच्या किमती 
नाशिक - राज्यातील कीडनाशकांची वार्षिक उलाढाल २५०० कोटींची आहे. करामध्ये अधिक ५ टक्‍क्‍यांची भर पडल्यामुळे कीडनाशकांच्या किमती वाढतील. परिणामी सव्वाशे कोटींचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी पडणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र प्रमाणित कंपनीच्या एकाच कीडनाशकाची किंमत सर्वत्र एकसारखीच राहणार असल्याने यात होणारी अडवणूक थांबणार आहे.

कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व यासारख्या उत्पादनांवर १८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत एक्‍साईज १ टक्का व व्हॅट ५ टक्के अशी कर आकारणी होती. यातून काही उत्पादनांत १२ टक्के तर काही उत्पादनांत ६ टक्के वाढ लागू होणार आहे. बहुतांशी उत्पादनांवर यापूर्वीच १२ टक्के आकारणी होत असल्याने त्यात ६ टक्के वाढ होईल. मात्र तरीही अधिकच्या खर्चाचा भार तर शेतकरी ग्राहकांवरच पडणार आहे. किमान सव्वाशे कोटी रुपये जास्तीचे शेतकऱ्यांना द्यावे लागणार असल्याचे कृषी उद्योजक एस. बी. काशिद यांनी सांगितले. 

काशिद म्हणाले की, जीएसटी कायद्यामध्ये अनेक किचकट नियमांना सामोरे जावे लागणार आहे. कृषी निविष्ठांचा ८० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार हा ग्रामीण भागात चालतो. यात शेतकरी ग्राहकांकडे बहुतांश वेळी रोख रक्कम नसल्याने उधारीवर व्यवसाय करावा लागतो. एका व्यावसायिकाने एक कोटी रुपयांची उधारी दिली तर त्या रक्कमेसाठी १८ लाख रुपये कर द्यावा लागतो. जीएसटीच्या नियमानुसार तुम्हाला संबंधित व्यवहारासाठी कर तर भरावाच लागेल. यामुळे अडचणी वाढणार आहे.  एकीकडे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात असतांना दुसरीकडे मात्र सरकार अशा गोष्टीवर विक्रीची बंधने टाकून अडथळे निर्माण करीत आहे.