बोराला द्या योग्य खतमात्रा

डॉ. शशांक भराड, डॉ. अतुल वराडे
गुरुवार, 20 जुलै 2017

बोरीच्या नवीन झाडांना वळण देणे पुढील व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. कलम लावल्यानंतर नवीन फुटीला बांबूच्या काठीचा आधार द्यावा. नवीन फुटीवर किंवा जागेवरच भरलेला नवीन डोळा फुटून ६० सें.मी.पर्यंत येणाऱ्या फांद्या १५-२० सें.मी. अंतरावर वाढू द्याव्यात. अशाप्रकारे झाडांचा मजबूत सांगाडा तयार करून घ्यावा. पहिल्या तीन वर्षांत वळण देण्याचे काम पूर्ण करावे. बोरीचा बहर चालू हंगामातील नवीन फुटीवरच येत असल्यामुळे अधिक उत्पादनासाठी झाडावर जास्तीतजास्त नवीन फूट असणे गरजेचे आहे.

दरवर्षी छाटणी करणे ही बोरीच्या उत्पादन व्यवस्थेमधील महत्त्वाची बाब आहे. बोरीच्या झाडाची छाटणी एप्रिल ते मे महिन्यात पहिल्या पंधरवड्यात करावी. त्यानंतर मात्र छाटणी करू नये. कारण, त्या वेळी झाडांची सर्व पाने झडून झाडे विश्रांती घेत असतात. या वेळी झाडावरील वाळलेल्या, बारीक फांद्या तसेच रोगट व कीडग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात. अशाप्रकारे 
छाटणी केल्यामुळे येणाऱ्या नवीन फांद्यावर भरपूर फूल व फळधारणा होते. 

ओलीत व्यवस्थापन  
बोरीच्या फुलांची व फळांची वाढ पावसाळ्यात होते; मात्र पावसाळ्यात झाडांना पाणी देण्याची आवश्‍यकता भासत नाही. पावसाचा खंड पडला तर १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे. पावसाळा संपताच प्रत्येक आळ्यात ३० सें.मी. जाडीचा वाळलेल्या पानांचा थर द्यावा. योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास फूल व फळगळ कमी होते. फळांची वाढही चांगली होते. तसेच फळांना चकाकी येऊन त्यांची प्रतही सुधारते.

टीप - स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा पाऊस आल्यानंतर द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा फळधारणा सुरू झाल्यानंतर आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात द्यावी. खते देताना मुख्य खोडापासून १ ते १.५ फूट अंतरावर संपूर्ण आळ्यात समप्रमाणात पसरून द्यावीत. 

- डॉ. शशांक भराड, ९६५७७२५७११ (उद्यानविद्या विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

टॅग्स