खाद्यतेलाच्या मूलभूत आयात दरात वाढ

खाद्यतेलाच्या मूलभूत आयात दरात वाढ

अधिसूचना जारी; रिफाइंड पामतेलाचा दर प्रतिटन ७५० डॉलरवर

नवी दिल्ली - केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढविल्यानंतर आता आयात तेलाच्या मूलभूत दरात देखील वाढ करण्यात आली आहे. 
रिफाइंड, कच्च्या तेलाच्या मूलभूत आयात किमती सरासरी प्रतिटनामागे ५० डॉलरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क विभागाने जारी केली आहे.

रिफाइंड पामोलिन तेलाची मूलभूत आयात किंमत प्रतिटन ७६० डॉलर तर कच्च्या पामोलिन तेलाची किंमत प्रतिटन ७५७ डॉलर एवढी निश्‍चित केली आहे. रिफाइंड पामतेलाचा दर प्रतिटनामागे ४९ डॉलरने वाढवून ७५० डॉलर केला आहे. तसेच कच्च्या सोयातेलाचा मूलभूत आयात दर प्रतिटनामागे १६ डॉलरने वाढवून ८५१ डॉलर निश्‍चित केला आहे, असे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे. जागतिक स्तरावरील तेलाचे दर आणि परकीय चलन दरात झालेला बदल याआधारे केंद्र सरकारकडून आयात तेलाच्या मूलभूत दरात सुधारणा केली जाते. याआधी ऑगस्टमध्ये रोजी आयात तेलाच्या मूलभूत दरात बदल केला होता. आता आयात तेलाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 
 

गेल्या वर्षी खाद्यतेलाची विक्रमी आयात
भारत हा खाद्यतेलाचा आयात करणार प्रमूख देश आहे. गेल्या वर्षी (२०१५-१६) देशात विक्रमी १४.६ दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com