भारतात भात उत्पादन १०८ दशलक्ष टन होणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

‘यूएसडीए’चा अंदाज; गेल्या वर्षीएवढेच यंदा उत्पादन

नवी दिल्ली - भारतात भात पीक क्षेत्र वाढले असले तरी उत्पादन गेल्या वर्षी एवढेच राहण्याची शक्यता अाहे. भारतात २०१७-१८ या वर्षात भात उत्पादन १०८ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला अाहे. 

भारतात भातपिकाने अधिक क्षेत्र व्यापले अाहे. मात्र, भाताचे प्रतिहेक्टरी उत्पादन तीन टक्क्यांनी घटणार असल्याची चिन्हे दिसत अाहेत. यंदाच्या वर्षात भात उत्पादन प्रतिहेक्टरी ३.६४ किलोग्रॅम मिळेल, असे ‘यूएसडीए’ने म्हटले अाहे.

भात पीक क्षेत्र अधिक असलेल्या मध्य अाणि ईशान्य भारतात समाधानकारक पाऊस झाला अाहे. यामुळे भात पीक क्षेत्रात वाढ झाली अाहे. भारतासह थायलंडमधील भात उत्पादन वाढण्याचा अंदाज अाहे. थायलंडमधील भात उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६ टक्क्यांनी वाढून २०.४ दशलक्ष टनांवर पोचेल. या देशात मुख्यतः मे तू जून दरम्यान भात लागवड केली जाते. उन्हाळातही भात पीक घेतले जाते. दोन्ही हंगामात भात पीक क्षेत्र वाढणार असल्याचे ‘यूएसडीए’ने नमूद केले अाहे. 

कापूस उत्पादन वाढणार
देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात २०१७-१८ या वर्षात कापूस पीक क्षेत्रात वाढ झाली अाहे. यामुळे उत्पादन ७ टक्क्यांनी वाढेल. भारतातील एकूण कापूस उत्पादन २९ दशलक्ष गाठींवर (एक गाठ- ४८० पौंड) पोचेल, असा अंदाज ‘यूएसडीए’ने व्यक्त केला अाहे.

भारतातील भात उत्पादन अंदाज (दशलक्ष मेट्रिक टनामध्ये)
वर्ष    उत्पादन

२०१५-१६     १०४.४१
२०१६-१७     १०८
२०१७-१८     १०८

स्त्रोत - यूएसडीए