अधिक ऊस उत्पादन, जादा साखर उताऱ्यासाठी - व्हीएसआय ०८००५

डॉ. रमेश हापसे
गुरुवार, 27 जुलै 2017

ही जात को-०३१० आणि को-८६०११ या दोन जातींचा संकर. ही जात जलद वाढणारी तसेच को-८६०३२ पेक्षा जास्त ऊस व साखर उत्पादन देणारी आहे. खोडवा पिकाचे चांगले उत्पादन मिळते.

तुरा येत नाही, फुटवे व पक्व उसांची जास्त संख्या असते, पानांवर कूस नसते. चोथ्याचे प्रमाण अधिक असल्याने जातीमध्ये कडकपणा दिसून येतो. 

काणी, तांबेरा, ऊस लाल रंगाचा होणाऱ्या रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे.

आडसाली, पूर्वहंगामी व सुरू या तिन्ही हंगामात लागवड करता येते. कांडीमध्ये दशीचे प्रमाण अजिबात राहत नाही.  १२ ते १४ महिन्यांत पक्व होणारी जात.

जातीचे सरासरी ऊस उत्पादन १४५.०८ टन प्रति हेक्टरी. सरासरी साखर उत्पादन २१.०८ टन प्रति हेक्टरी.  रसातील साखरेचे प्रमाण को-८६०३२ पेक्षा ४.२४ टक्के इतके जास्त.

या जातीचा खोडवा चांगला येतो. ऊस उत्पादकता प्रति हेक्टरी १२२.५९  टन. को-८६०३२ या तुल्य जातीपेक्षा ऊस उत्पादन १६.३८ टक्के व साखर उत्पादन २१.१५ टक्के आणि खोडवा उत्पादन १९.१० टक्के जादा मिळते.

या जातीमध्ये अधिक साखर असल्याने गुळासाठी फायदेशीर.

ओळखण्याच्या खुणा -
पाने लांब, मध्यम रुंद व गर्द हिरवी असून, मध्य भागास झुकलेली असतात. पानांच्या देठावर कुस नसल्याने याचा वापर जनावरांना चाऱ्यासाठी चांगला होतो.

देठाचा पृष्ठभाग हिरवा असून, त्यावर मेणाचे प्रमाण कमी असते. पानाच्या जोडावर एका बाजुने लांब (२-३ इंचापर्यंत) कान (कर्णिका) असतो.

कांड्यांचा रंग हिरवट पारवा असून त्यावर मेणाचे मध्यम प्रमाण असते. कांड्या मध्यम जाड असून, लांब व एकसारख्या असतात. कांडीवर डोळ्याच्या उभ्या रेषेत खाच (पन्हाळी) असते. डोळा गोल व मध्यम आकारमानाचा असतो. कांड्यांमध्ये दशीचे प्रमाण अजिबात नसते.

गुणदोष -
ही जात इतर जातींपेक्षा जलद वाढत असल्याने थोडेसे लोळण्याचे आणि पांक्षा फुटण्याचे प्रमाण दिसून येते.

टीप -
'व्हीएसआय ०८००५’ या जातीचे बेणे खरेदी करताना भेसळयुक्त बेण्याची खरेदी कटाक्षाने टाळावी. या जातीचे बेणे व्हीएसआय संस्थेतून किंवा साखर कारखाना रोपवाटिकेतून खरेदी करावे.

जातीमध्ये फुटव्यांचे प्रमाण जास्त असल्याने ५ फूट x २ फूट अंतरावर लागवड करावी. कारखान्याच्या ऊस विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नंतरच लागवड करावी.

- ०२० -२६९०२२४६ (प्रमुख शास्त्रज्ञ, ऊस प्रजनन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्‍टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

Web Title: agro news vsi 08005 sugarcane more production