दुबार पेरणी टाळण्यासाठी हंड्याने पाणी घालण्याची वेळ

पांडुरंग उगले
गुरुवार, 6 जुलै 2017

माजलगाव, जि. बीड - मृग नक्षत्राच्या सुरवातीला पडलेल्या पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे कोवळी पिके सुकून जात आहेत, काही ठिकाणी जमिनीतून निघणारे धानाचे मोड कोमेजून जात आहेत. पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकरी कापसाला हंड्याने पाणी घालून ते जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करण्याची घाई केली. सुरवातीला आठ-दहा दिवस पडलेल्या पावसावरच अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकाची पेरणी केली. सुरवातीच्या ओलीवर पेरलेले धान जोमाने उगवले; परंतु मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याची सोय असलेले शेतकरी स्प्रिंक्‍लर, ठिबक सिंचनाद्वारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी कोरडवाहू जमीन असलेले शेतकरी हंड्याने पाणी घालून कापूस, तूर यासारखी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.