दीड वर्षात शंभरावर रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास 

दीड वर्षात शंभरावर रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास 

गंगापूर,जि.औरंगाबाद - तालुक्‍यात अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आलेल्या एकशे दहा रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाकडे तालुक्‍यातील विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार धडक कारवाई राबवून सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्‍न त्वरित निकाली काढण्यात आले आहेत. यात अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शेतरस्ते, शिवरस्ते मोकळे केले असून यात शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिला आहे. 

शेताकडे जायच्या रस्त्याला खेटून अतिक्रमण वाढल्याने अनेक पिढ्यांपासून शेजारी शेतकऱ्यांमध्ये धुसफूस सुरू होती. अनेक ठिकाणी वादावादी होत होत्या. अनेक भांडणे तर न्यायालयात पोचली. यावर उपाय शोधण्यासाठी प्रशासनाच्या पुढाकाराने तालुक्‍यातील रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्यात  आली.

रस्ते झाले मोकळे 
शेतीची वाटणी करताना चारचौघांच्या मध्यस्थीने शेत देण्याबरोबर त्या शेतातील वहिवाटीसाठी शेतरस्ता दिला जातो. त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असते किंवा नसतेही. हे फक्‍त एकमेकांच्या विश्‍वासार्हतेवर चालते. शेतकऱ्यांचा शेतमाल ने-आण करण्यासाठी शेतशिवारापर्यंत बैलगाडी पोचावी, शेतरस्ते वापरण्यासाठी मिळावेत, यासाठी शासनाने आजही शेतरस्ते, पाणंदरस्ते वापरास ठेवले आहेत. काही वेळी आपापसांतील मतभेद वाद वाढल्याने किरकोळ कारणांवरून या रस्त्यांवर अतिक्रमण होते व या रस्त्यांवर अडवणूक केली  जाते. परंतू  अतिक्रमणे हटविल्याने रस्ते मोकळे झाले आहेत.

शेताकडे जाणाऱ्या पाऊलवाटा, गाडीवाट व शिवरस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांची अतिक्रमणे वाढली होती. लहान शेतकरी अडचणीत होते. अनेक रस्त्यांवरून भांडणे झाली आहेत. एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा सर्वच रस्त्यांचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत. रस्ते मोकळे करताना गावांचे तलाठी, पोलिस पाटील, तंटामुक्त समिती, पोलिस व गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. 
-चंद्रकांत शेळके, तहसीलदार 

या रस्त्यांवरील  हटविली अतिक्रमणे
 जामगाव 
 बगडी - वाहेगाव 
 रांझणगाव (शे.)- झोडेगाव 
 गाजगाव
 काटेपिंपळगाव 
 पेंडापूर 
 माळीवाडगाव - रायपूर 
 धनगरपट्टी - मिसाळवस्ती 
 दिघी 
 एकबुर्जी वाघलगाव 
 अंबेलोहळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com