'नागपूर नॅचरल'

'नागपूर नॅचरल'

सध्या नागपूर येथे कदीमबाग नर्सरी येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून हेमंत चव्हाण कार्यरत आहेत. ते मूळ गोंदियाचे. या जिल्ह्यात त्यांची शेती होती. परंतु नोकरीमुळे तिकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याने आणि गोंदियाहून नागपूरला बदली झाल्याने त्यांनी ही शेती विकली.

‘फील्ड’वरील नोकरी ते नागपुरातील विक्री केंद्र    
प्रवास

सन १९९१ नंतर रामटेक (जि. नागपूर) परिसरात चव्हाण नोकरीत कार्यरत होते. या परिसरात आदिवासीबहुल वस्ती आहे. या पुढील काळात नैसर्गिक शेती पद्धतीचे अन्न, त्यावर आधारीत आरोग्य व दुसऱ्या बाजूला शहरातील मानवी आरोग्य व आहार यांचा त्यांनी अभ्यास केला. 

शेतकऱ्यांना मिळणारे दर
उदा. गहू

 बाजार समितीतील दर- १५ रुपये प्रति किलो
 ग्राहक दर- २५ ते ३० रुपये
 तर हाच दर शेतकऱ्यांच्या पदरात पडतो.
 पुढे याच दरात २० टक्के वाढ करून ग्राहकांना तो दिला जातो. 
 म्हणजेच शेतकऱ्याचा वाचतो- अडत, हमाली, तोलाई आदी खर्च

भाजीपाला
 वर्षभर किलोला २० रुपये हमी दर
 समजा एखाद्या शेतमालाला दर ८० रुपये प्रति किलो दर बाजारात पोचला तर
 या शेतकऱ्यांनाही त्याच्या जवळपास जाणारा दर दिला जातो. 

‘नागपूर नॅचरल’ विक्री  व्यवस्थेतील सहभागी
 १० शेतकऱ्यांची कोअर कमिटी
 दर आठवड्याला होते त्यांची बैठक. त्यात पुढील कामकाजाचे नियोजन
 ''नागपूर नॅचरल’ केंद्राच्या उभारणीसाठी कमी पडणारी काही रक्कम दहा शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० हजार रुपये देऊन उभी केली. 
 एप्रिल २०१७ मध्ये चव्हाण व अन्य शेतकऱ्यांकडून सेंद्रिय राज्य सिक्‍कीमचा दौरा केला. यावेळी नैसर्गिक शेती उत्पादक म्हणून राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी गटाच्या कार्याची विशेष प्रशंसा केली.  

अर्थकारण (मासिक)
 जागेचे भाडे- २५ हजार रुपये
 उलाढाल- तीन लाख रुपये 
 मेंटेनन्स खर्च- २० टक्के 
 फायदा- २० टक्के- 
मात्र हीच रक्कम मेंटेनन्स वा अन्य कामांसाठी वापरली जाते. सद्यस्थितीत केंद्राचे काम ना नफा ना तोटा तत्त्वावर  

 मान्यवरांकडून कौतुक 
यांचे लाभले मार्गदर्शन- तत्कालीन कृषी सहसंचालक विजय घावटे, डॉ. जे.एस. भुतडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, डॉ. अर्चना कडू, प्रभारी कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी पंढरी डाकळे. विशेष म्हणजे पुढील जानेवारीत चव्हाण सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर विक्री व्यवस्तेवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

   विक्री व्यवस्थेचा पहिला प्रयत्न 
 धान्य महोत्सव- (तीनदिवसीय) सन २००९ ते २०१४ या काळात शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विविध ठिकाणी 
 यातून उलाढाल व्हायची- सुमारे ३० लाख रुपये 
 महोत्सवासाठी कोणतेही अनुदान नसल्याने स्टॉलधारक इच्छुकाकडून दोन हजार रुपये आकारले जायचे. 

राज्याच्या प्रत्येक भागाच्या अोळखीनुसार नैसर्गिक उत्पादनांना मार्केट मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच ‘नागपूर नॅचरल'' असे नाव आम्ही आमच्या केंद्राला दिले आहे. याच धर्तीवर अमरावती नॅचरल या आउटलेटची उभारणी शेतकरी करणार अाहेत. 
- हेमंत चव्हाण , ७५८८६९०६८८, ९१३०००१२१३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com