शास्त्रोक्त व्यवस्थापनातून दुष्काळातही सर्वोत्कृष्ट मोसंबी

शास्त्रोक्त व्यवस्थापनातून दुष्काळातही सर्वोत्कृष्ट मोसंबी

अौरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर या कायम अवर्षणग्रस्त तालुक्यातील शिरेगाव येथील अनिल कऱ्हाळे यांनी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवत मोसंबीची अत्यंत उत्कृष्ट शेती केली आहे. 

पीकपद्धती
शेती- तेरा एकर, त्यात मोसंबी व आले प्रत्येकी दीड एकर, पाच ते सहा एकर कपाशी, खरिपात बाजरी, भुईमूग. सन २०१२ पासून मोसंबीने उत्पादन देण्यास सुरवात केली.  

माती परीक्षणाचे महत्त्व समजले  
अौरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी बागेला दिली. त्यांनी अनिल यांना माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले. ते करून घेतल्यानंतर आपल्या जमिनीची परिस्थिती त्यांना समजली. जमीन जोवर सुधारत नाही तोवर कोणत्याही पिकाचे अपेक्षीत उत्पादन मिळणे अशक्‍य असल्याचे समजले. 

असे केले बागेत बदल  
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बागेचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन सुरू
माती परीक्षणामुळे कोणत्या जमिनीला कोणत्या व किती खताची गरज आहे याचा अंदाज आला. 
हिरवळीच्या खतांसह शेणखताच्या वापराला प्राधान्य 
माती परीक्षणातून जमिनीचा पोत सुधारण्याकडे विशेष लक्ष
शास्त्रोक्‍त पद्धतीने बागेचे एकात्मीक खत व्यवस्थापन
अवर्षणातही उत्पादनात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न
पाण्याची नड भागविण्यासाठी व विकतचे पाणी घेणे थांबवण्यासाठी शेततळे 
सेंद्रिय आच्छादनाच्या वापराने पाणी बचतीचा मंत्र अवगत. प्रचंड अवर्षणात प्रत्येक वर्षी पाचशे मिलीमीटरच्या आत पाऊस होऊनही कऱ्हाळेंची मोसंबीची बाग तगून 
 
शेततळ्यामुळे पाण्यावरील खर्च थांबला 
गंगापूर कायम दुष्काळी तालुका. त्यामुळे शिरेगावच्या परिसरात पर्जन्यमान अन्य भागांच्या तुलनेत कमीच असते. बाग जगविण्यासाठी पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. सन २०१३ ते २०१७ या काळात प्रत्येकवेळेस ३१ हजार, ५० हजार, २० हजार रुपये असे दीड लाख रुपये त्यासाठी खर्चावे लागले. आता चार लाख रुपये खर्चून शेततळे घेतले आहे. त्यातून दरवर्षी पाण्यावर होणारा खर्च व पाण्याविना बाग जगविण्याची चिंता कमी झाली. मोसंबीचा मृग बहार काटेकोर घेणारे अनिल झाडावर फळ असताना ३२  लिटर प्रति झाड तर एरवी दोन दिवसाआड १६ लिटर पाणी देतात. 

फळधारणेच्या अवस्थेत गोमुत्राचा वापर  
ठिबकद्वारे तीन दिवसाआड २० ते २५ लिटर गोमूत्र फळधारणेच्या काळात 
फळ काढणीनंतर त्याचा वापर बंद. या पद्धतीमुळे फळाची ‘क्‍वालीटी’ सुधारल्याचे अनिल सांगतात. - गोमूत्र उपलब्ध व्हावे यासाठी पाच गायी. दोन बैलजोडी. त्यातून शेणाची काही गरज भागते. 
दरवर्षी झाडाला ३० ते ३५ किलो शेणखत देण्यावर भर. प्रसंगी विकतही घेतले जाते.  
  
विद्यार्थ्याप्रमाणे काढल्या नोट्‌स  
बागेचे व्यवस्थापन करणाऱ्या अनिल यांनी तज्ज्ञ देत असलेली प्रत्येक टीप लिहून ठेवली आहे. त्यानुसार आलेले अनुभवही डायरीत नोंदवल्याने फायदा झाला आहे. 
 
उन्हाळ्यात सेंद्रिय आच्छादन 
उन्हाळ्यात शक्‍य तेवढ्या पाण्याची बचत करण्यासाठी मक्याचे भूसकट, काडीकचरा रूपी सेंद्रिय आच्छादनाचा मोठा फायदा होतो. त्यामुळे सुमारे ४० ते ४५ टक्‍के पाण्याची बचत होत असल्याचे अनिल सांगतात. 

मोसंबीचे उत्पादन 
वर्ष    उत्पादन. (दीड एकरात)      मिळालेला दर रु. (प्रतिटन)
२०१४           २२ टन    १४,५०० रु. 
२०१५           २७  टन    १५,००० रु. 
२०१६      ०९  टन    १५,००० रु. 
२०१७        ३३  टन    १२,५०० रु. 
यंदा  ८ टन   एक लाख ६० हजार  रुपयांत उक्‍ती बाग  
अवर्षणामुळे अनेकवेळा उत्पादन घटते.  
अनिल कऱ्हाळे, ९४०४६७८०६२ 

शास्त्राचा आधार व एकात्मीक व्यवस्थापन हे कऱ्हाळे यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या शेतीपद्धतीतील बदल प्रेरणादायी आहे. केवळ खर्चात बचत एवढेच नाही, तर अवर्षणातही बाग कशी टिकविता येईल याचे उत्तम उदाहरण त्यांच्या शेतीतून समोर येते.
- डॉ. किशोर झाडे. कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद 
९९२१८०८१३८  

शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी 
एकदा झाडांवर मरणकळा आली होती. निरीक्षणात डिंक्‍या असल्याचे लक्षात आले. वेळीच रसायनांचा वापर ठिबकद्वारे करून झाडे वाचवली. 
बागेतील स्वच्छता लक्षवेधी   
पंधरा मेच्या आसपास प्रत्येक वर्षी बाग ताणावर, तंत्रज्ञान अवगत केल्याने झाडे अंदाजे ताणावर सोडणे बंद केले.     
द्रवरूप खते फवारणीच्या माध्यमातून देण्यावर भर 
फळगळ रोखण्यासाठी पुरचुंडीचा वापर व बागेत धूर करण्याचाही अवलंब 
उष्णतेच्या झळांपासून संरक्षणासाठी बागेच्या चारही बाजूंनी मका व गवताची लागवड. 
ट्रॅक्‍टरचलित यंत्राच्या सहाय्याने आंतरमशागत. 
हिरवळीच्या खतामुळे सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत 
पावसाळ्याआधी व नंतर बोर्डोपेस्ट लावल्याने डिंक्‍यावर नियंत्रण 
विद्राव्य खतांमुळे खतांची कार्यक्षमता वाढली. त्यांचा अतिरिक्त वापर घटला. 
शास्त्रोक्‍त नियोजनामुळे अनावश्यक खर्चाला ब्रेक 
ठिबक सिंचनाद्वारेच पाणी व विद्राव्य खते  
बहारकाळात साधारणत: तीन वेळा खते. गुंडी निघण्याच्या तयारीत असतांना पहिल्यांदा, त्यानंतर लिंबूच्या आकाराचे फळ झाल्यानंतर व त्यानंतर चिकूच्या आकारचे फळ झाल्यानंतर खत
फळ चिकूच्या आकाराचे झाले की ०-५२-३४ व ०-०-५० ठिबकने. फळाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील दीड महिन्यात प्रति एकर २ ते ३ किलो प्रमाणात देण्याचे तंत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com