आणखी १ लाख टन तुरीची खरेदी करणार- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई (प्रतिनिधी): केंद्र सरकारने ३१ मेपर्यंत महाराष्ट्राला आणखी १ लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की महाराष्ट्राने २ लाख टन तूर खरेदीची परवानगी केंद्राकडे मागितली होती. सध्या एक लाख टन खरेदीचीच परवानगी दिली आहे. आगामी काळातील परिस्थिती पाहून आणखी एक लाख टन तूर खरेदीलाही परवानगी दिली जाईल, असे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.

यंदा जवळपास सहा लाख टनाहून अधिक तूर खरेदी होईल. शिवाय, शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारी तूर टाकणार असतील, तर त्यांच्यावर नजर ठेवली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तूरप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.