कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढ 

राजकुमार चौगुले 
मंगळवार, 23 मे 2017

कोल्हापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस ४० ते ९० रुपये दर मिळाला. टोमॅटोची दररोज १४०० ते १५०० कॅरेट आवक झाली. वांग्याची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस ७० ते २०० रुपये दर मिळाला. वांग्याच्या दरात गेल्या सप्तहाच्या तुलनेत काहीशी वाढ झाली. 

कोल्हापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस ४० ते ९० रुपये दर मिळाला. टोमॅटोची दररोज १४०० ते १५०० कॅरेट आवक झाली. वांग्याची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस ७० ते २०० रुपये दर मिळाला. वांग्याच्या दरात गेल्या सप्तहाच्या तुलनेत काहीशी वाढ झाली. 

हिरव्या मिरचीची तीनशे ते चारशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस ३८० ते ५०० रुपये दर होते. गवारीच्या आवकेत गेल्या सप्ताहाच्या तुलनेत पाच ते दहा टक्‍यांनी घट झाली. गवारीची दररोज तीस ते पस्तीस पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस १३० ते २५० रुपये दर मिळाला. कारल्याची पन्नास ते शंभर पाट्या आवक झाली. कारल्यास दहा किलोस ११० ते ३०० रुपये दर मिळाला. सातारा, सांगली परिसरातून आल्याची शंभर ते दीडशे पोती आवक झाली. आल्यास दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगेची दररोज पन्नास ते साठ बंडल आवक झाली. शेवगा शेंगेच्या दहा किलोस ६० ते २४० रुपये दर होता.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक या सप्ताहात वाढली. दररोज वीस ते पंचवीस हजार पेंढ्या आवक होती. गेल्या सप्ताहात ती दहा ते पंधरा हजार पेंढ्या इतकी होती. त्यात दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी वाढ होऊन ती या सप्ताहात वीस हजार पेंढ्यापर्यंत पोचली. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्‍यातील गणेशवाडी परिसरातून कोथिंबिरीची आवक होत आहे. पंधरवड्यापूर्वी जिल्ह्यात वादळी पाऊस झाल्याने कोथिंबिरीचे प्रमाण घटले होते. ते आता पूर्वपदावर येत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते १४०० रुपये दर मिळाला. येत्या पंधरा दिवसांपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केला. मेथीची चार ते पाच हजार पेंढ्या इतकी आवक झाली. मेथीस शेकडा ८०० ते १२०० रुपये दर होता.

अॅग्रो

अमेरिकेच्या मध्य पूर्व विभागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनवरील तांबेरा (रस्ट) हा रोगाचा फारसा अनुभव नसला तरी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

गोठ्यातील सूक्ष्म निरीक्षणाद्वारे व्यवस्थापनामध्ये सुधारणा करता येतात, आजार टाळता येतात, उत्पादनातील घट टाळता येते. म्हणून दररोज...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

खाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर तेल...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017