उन्हाचा चटका वाढला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

कमाल, किमान तापमानात तीन अंशांपर्यंत वाढ 
पुणे - मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता. २७) राज्यात वातावरण निरभ्र राहणार आहे. पुणे परिसरात मंगळवारी आणि बुधवारी रोजी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. 

कमाल, किमान तापमानात तीन अंशांपर्यंत वाढ 
पुणे - मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता. २७) राज्यात वातावरण निरभ्र राहणार आहे. पुणे परिसरात मंगळवारी आणि बुधवारी रोजी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. 

मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

 राज्यात सध्या कोरडे वातावरण आहे. गुरुवारी सकाळपर्यंत भिरा येथे ४२.० अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. नगर येथे १५.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. लक्षद्वीप ते कर्नाटकचा दक्षिण भागात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे कर्नाटकांच्या किनारपट्टीवर या स्थितीचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूंपातर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मंगळवार आणि बुधवार रोजी ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.९ (१८.०), नगर ४०.२ (१५.२), जळगाव ३८.० (१६.०), कोल्हापूर ३७.० (२२.८), महाबळेश्‍वर ३३.२ (१९.६), मालेगाव ४०.८ (२०.२), नाशिक ३७.३ (१८.१), सांगली ३८.४ (२१.२), सातारा ३७.० (१९.४), सोलापूर ३८.८ (१९.३), सांताक्रूझ ३२.६ (२१.९), अलिबाग ३०.९ (२२.४), रत्नागिरी ३४.० (२१.१), डहाणू ३२.६ (२१.७), अौरंगाबाद ३७.२ (१८.२), परभणी ३८.४ (१९.६), नांदेड (१९.५), बीड ३८.२, अकोला ३९.९ (२०.२), अमरावती ३८.८ (२१.६), बुलडाणा ३७.४ (२२.२), चंद्रपूर ३९.० (२५.०), गोंदिया ३७.२ (१९.६), नागपूर ३८.४ (१८.९), वर्धा ३९.० (२०.५), यवतमाळ ३५.५ (२१.०). 

Web Title: summer tempreture