जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?

Reliance Jio
Reliance Jio

मुंबई: रिलायन्स जिओच्या 'धन धना धन' आणि 'समर सरप्राइज' ऑफरची मुदत चालू महिन्यात संपुष्टात येणार आहे. 'धन धना धन' ऑफर संपुष्टात आल्यानंतर कंपनीने 'समर सरप्राइज' ऑफर देऊ केली होती. त्यामध्ये 303 रुपयांचे रिचार्ज आणि 99 रुपयात प्राईम मेंबरशिप देण्यात आली होती. कंपनीने या नव्या ऑफरअंतर्गत तीन महिन्यांसाठी अमर्यादित डेटा आणि कॉलिंग तसेच एसएमएस सर्व्हिस, जिओ अॅप सबस्क्रिप्शनदेखील देऊ केले होते. परंतु, ही ऑफर संपल्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

जर तुम्ही 'समर सरप्राइज' किंवा 'धन धना धन' प्लॅन घेतला असेल तर तुमची मोफत सेवा 30 जून रोजी बंद झाली आहे. जेव्हा तुम्ही 303 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे रिचार्ज केले असेल याअंतर्गत तुम्हाला सेवा मिळतील. म्हणजे तुम्हाला आता ऑगस्टमध्ये पुढील रिचार्ज करावे लागेल. त्यामुळे आता तुमच्याकडे किती बॅलेन्स शिल्लक आहे ते जाणून घ्या.

बॅलेन्स कसं चेक कराल?
आता तुमच्याकडे नेमका किती बॅलेन्स शिल्लक आहे तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिलं म्हणजे मायजिओ अॅप आणि दुसरं म्हणजे जीओ.कॉम. मायजिओ अॅपवर लॉगिन केलं तर उजव्या बाजूला तुमचा बॅलेन्स दिसेल. जर तुम्ही केवळ समर सरप्राइज किंवा धन धना धन ऑफर वापरत असाल तर तुमचं बॅलेन्स शून्य दिसेल. तुमचा सध्याचा प्लॅन जाणून घेण्यासाठी तिथे माय प्लॅन हा ऑप्शन निवडा. तिथे तुम्हाला प्लॅनची वैधता, बॅलेन्स, मेसेज आणि डेटा बॅलेन्सची माहिती मिळेल.

जीओ.कॉम ला भेट दिल्यानंतर साइन इन करताना तुमच्या जिओ क्रमांकावर ओटीपी येईल. लॉगिन झाल्यावर तुम्हाला तुमचा बॅलेन्स दिसेल.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com