Share Market: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 425, तर निफ्टी 130 अंकांनी वधारला

सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅपअप ओपनिंग दिलं.
share market
share marketSakal

गुरुवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद झाला. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅपअप ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 427.49 अंकांनी वधारून 56245.60 वर सुरु झाला, तर निफ्टी 133.65 अंकांनी वधारून 16,761.65 वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, हिंदाल्कोसह 46 शेअर्स वाढीसह सुरु झाले, तर एनटीपीसी, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, ग्रासिम या 4 शेअर्समध्ये घसरणीची नोंद झाली.

share market
50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

तत्पूर्वी काल शेअर बाजारात तेजी दिसून आली. स्थिर सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शेवटच्या सत्रात शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. सेन्सेक्स 436.94 अंकांनी म्हणजेच 0.79 टक्क्यांनी वधारून 55818.11वर बंद झाला, तर निफ्टी 105.25 अंकांनी म्हणजेच 0.64 टक्क्यांनी वधारून 16,628.00 बंद झाला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com