डायना पेंटीचा रिक्षाप्रवास 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मागच्या वर्षी डायना पेंटीचा "हॅप्पी भाग जाएगी' हा चित्रपट आला होता. तो फार काही चालला नाही. पण या वर्षी डायना आणखी एक चित्रपट करते आहे. तोसुद्धा खुद्द फरहान अख्तरबरोबर. फरहान सध्या "लखनौ सेंट्रल' हा चित्रपट करतो आहे. डायनाही या चित्रपटात काम करते आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लखनौमध्ये सुरू आहे. लखनौला नवाबांचं शहर म्हणतात. या चित्रपटाचे शूटिंग करत असताना जेव्हा डायनाला सुट्टी मिळाली तेव्हा डायनाने सगळ्यांना आश्‍चर्यचकित करून चक्क लखनौचा खरा अंदाज घेण्यासाठी लखनौच्या खास रिक्षातून प्रवास केला. ती संपूर्ण लखनौ रिक्षातून फिरली.

मागच्या वर्षी डायना पेंटीचा "हॅप्पी भाग जाएगी' हा चित्रपट आला होता. तो फार काही चालला नाही. पण या वर्षी डायना आणखी एक चित्रपट करते आहे. तोसुद्धा खुद्द फरहान अख्तरबरोबर. फरहान सध्या "लखनौ सेंट्रल' हा चित्रपट करतो आहे. डायनाही या चित्रपटात काम करते आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लखनौमध्ये सुरू आहे. लखनौला नवाबांचं शहर म्हणतात. या चित्रपटाचे शूटिंग करत असताना जेव्हा डायनाला सुट्टी मिळाली तेव्हा डायनाने सगळ्यांना आश्‍चर्यचकित करून चक्क लखनौचा खरा अंदाज घेण्यासाठी लखनौच्या खास रिक्षातून प्रवास केला. ती संपूर्ण लखनौ रिक्षातून फिरली. तिने बडा इमामवाडा, रूमी दरवाजा, द रेसिडेन्सी अशी काही ठिकाणे पाहिली. तिची आवडती खास लखनौ चिकन कढाई खाल्ली आणि लखनौ मार्केटमधून आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबासाठी खूप भेटवस्तू खरेदी केल्या. डायनाची ही लखनौ सफर चांगलीच रोमांचकारी ठरली म्हणायची!  
 

Web Title: Diana Penty explores Lucknow in a rickshaw