Norovirus: कोरोना, मंकीपॉक्सनंतर भारतात नवा विषाणू; वाचा लक्षणे

या व्हायरसचे दोन रूग्ण केरळातील तिरूवनंतपुरम येथे आढळले आहेत.
Norovirus
NorovirusSakal

तिरूवनंतपुरम : कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका सध्या भारतात वाढत असताना एका नव्या व्हायरसने तोंड वर काढलं आहे. या व्हायरसचे दोन रूग्ण केरळातील तिरूवनंतपुरम येथे आढळले आहेत. 'नोरोव्हायरस' (Norovirus) असं नव्या व्हायरसचे नाव असून या विषाणूची लागण झालेले दोन्ही बालके आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना निगराणीत ठेवलं गेलं आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

(New Virus In India)

यासंदर्भातील माहिती केरळचे आोरग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की, "तिरूवनंतपुरम येथील विझिंजम परिसरात या विषाणूचे दोन प्रकरणे समोर आले आहेत. पण काळजी करण्याची गरज नाही कारण परिस्थिती आवाक्यात आहे. त्यांच्या रक्ताचे सँपल चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत." अशी माहिती त्यांनी दिली.

Norovirus
69 Loan App Banned: कर्जाच्या वसुलीसाठी छळ; सरकारची गुगलला नोटीस

काय आहे नोरोव्हायरस ?

नोरोव्हायरस (Norovirus) हा प्राण्यांच्या माध्यामातून पसरणारा विषाणू आहे. ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग होतो. हा विषाणू दूषित ठिकाणी किंवा उघड्यावरील अन्न खाल्ल्याने संक्रमित होऊ शकतो. याशिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्येही त्याचा प्रसार होऊ शकतो. इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीला नोरोव्हायरसची अनेक वेळा लागण होऊ शकते, असंही डॉक्टरांनी सांगितले आहे.

लक्षणे

नोरोव्हायरस (Norovirus) हा मानवाच्या पोटावर आक्रमण करतो आणि पोटात पोहोचताच आतड्यावर आक्रमण करतो. अतिसार, उलट्या, पोटात दुखणे आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे ही संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. याशिवाय ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रासही बाधित रुग्णाला दिसून येतो. सामान्यतः हा विषाणू सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करू शकतो असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे, परंतु लहान मुले, वृद्ध आणि आजारी असलेल्या लोकांमध्ये हा विषाणू अधिक लवकर पसरतो. विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 12 ते 48 तासांनंतर लक्षणे दिसायला लागतात, तर वेळेवर उपचार सुरू केल्यास संक्रमित व्यक्ती 3 दिवसांत बरी होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Norovirus
'आप'चे मंत्री EDच्या रडारवर; अटकेनंतर सत्येंद्र जैन यांच्यावर कारवाई

कशी घ्याल काळजी ?

प्राथमिक तपासणीत नोरोव्हायरस हा घातक असल्याचे आढळून आलेले नाही, परंतु त्याच्या उपचारासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही. म्हणूनच प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच दररोज प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना याचा धोका सर्वाधिक असतो. म्हणून प्राण्यापासून दूर राहण्याचा आणि ताजे अन्न खाण्याचा सल्ला दिला आहे. नोरोव्हायरसपासून बचाव करण्यासाठी साबणाने आणि कोमट पाण्याने हात धुवावेत. सॅनिटायझरनेही नोरोव्हायरस मरत नाही, त्यामुळे हँड सॅनिटायझर वापरणे फायदेशीर ठरणार नाही असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com